NSK26H34716
जळगाव : मिठाईवाटप कार्यक्रमात उपस्थित विशाल भोळे, ज्योती जैन, विनोद पाटील, सोनाली पाटील, वसंत गायकवाड आदी.
---
घरकाम करणाऱ्या १८० महिलांना मिठाईवाटप
‘आसरा’तर्फे उपक्रम; संघटनेने जोपासली सामाजिक बांधिलकी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : गरीब, कष्टकरी, घरकाम करणाऱ्या महिलांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी आसरा संघटनेतर्फे मिठाई, फरसाण वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत नगरसेवक विशाल सुरेश भोळे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पाणीटंचाई लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शाहूनगर येथील १८० घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळीनिमित्त भवरलाल आणि कांताई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने मिठाई व फरसाण वाटप कार्यक्रम शाहूनगरात करण्यात आला. यावेळी भवरलाल आणि कांताई जैन फाउंडेशनच्या प्रमुख ज्योती अशोक जैन, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव विनोद पाटील, नाट्य कलावंत सोनाली पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महिलांना मिठाई व फरसाण वाटप करण्यात आले. यावेळी विनोद पाटील यांनी संघटनेच्या कार्यासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. ‘आसरा’चे अध्यक्ष वसंत गायकवाड यांनी प्रास्ताविक तर संजय दुसाने यांनी सूत्रसंचालन केले. हितेंद्र टेकावडे यांनी आभार मानले. पाहुण्यांचे स्वागत वंदना गायकवाड, शिवाजी मुळीक, शीतल गायकवाड, सतीश सुर्वे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी वसंत सणस, रवींद्र मानकुंबरे, प्रमोद वाणी, मंगला गायकवाड, सागर गायकवाड, लता गायकवाड, नंदा कापरे यांनी सहकार्य केले.