दिवाळी तयारी मालिका : दिवाळीनिमित्ताने खासगी ट्रॅव्हल्स चालकांना शुभेच्छा दिवस

दिवाळी तयारी मालिका : दिवाळीनिमित्ताने खासगी ट्रॅव्हल्स चालकांना शुभेच्छा दिवस
Published on: 
फोटो : A15131 नाशिक : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे वाहने -- खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे ४० टक्क्यांनी वाढले दिवाळी प्रवासासाठी आगाऊ बुकिंगचा ओघ; गावी जाणाऱ्यांची गर्दी सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी बहुतांशी प्रवाशांनी आगाऊ बुकिंगला पसंती दिल्याने खासगी ट्रॅव्हल्सचे आतापर्यंत सुमारे ४० ते ५० टक्के बुकिंग पूर्ण झाले असून ट्रॅव्हल्स चालकांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. येत्या दोन दिवसांत शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांना सुट्ट्या लागल्यानंतर प्रवाशांची संख्या आणखी वाढणार असून, या वाढत्या मागणीमुळे ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने काम आणि शिक्षणानिमित्ताने घरापासून दुरावलेल्यांना गावाची ओढ लागली आहे. शासकीय कार्यालयांना दिवाळीच्या दोन ते तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत, तर खासगी कंपन्यांमधील कर्मचारी व व्यावसायिकही सुट्ट्या घेऊन गावी निघत आहेत. सुकर आणि गर्दीमुक्त प्रवासासाठी अनेक नागरिक खासगी लक्झरी बसेसला पसंती देत आहेत. सुट्ट्या लागताच वेळेवर तिकीट मिळणार नाही या भीतीपोटी आगाऊ बुकिंगचा ओघ वाढला असून, सुमारे २० ते २५ टक्के नागरिकांचा प्रवास आत्तापासूनच सुरूही झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत प्रवाशांची गर्दी वाढण्याचा अंदाज आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस आणि रेल्वेस्थानकांवर पाहायला मिळत आहे. सध्याही बस स्थानकांवर गर्दी दिसत असून, बुधवार-गुरुवारनंतर यामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वे तिकिटांच्या आगाऊ बुकिंगमध्येही मोठी वाढ झाली आहे. --चौकट पुणे, मुंबई प्रवाशांची संख्या अधिक खासगी ट्रॅव्हल्स किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या पुणे आणि मुंबईच्या प्रवाशांची आहे. पुणे व मुंबईतील काही नागरिक काम किंवा शिक्षणानिमित्ताने नाशिक शहरात आले आहेत, तर नाशिक शहरातील अनेक नागरिक व विद्यार्थी याच कारणांमुळे पुणे आणि मुंबईत वास्तव्यास आहेत. दिवाळीनिमित्त हे सर्व नागरिक आता आपापल्या गावी परतत आहेत.