विद्यार्थ्यांनी तयार केले आकाशकंदील

विद्यार्थ्यांनी तयार केले आकाशकंदील
Published on: 
फोटो : NSK26H34628 नंदुरबार : विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करताना प्राचार्य सुरेश पाटील, सुनीता निकम, शशिकांत पाटील आदी. ------------ विद्यार्थ्यांनी साकारले आकाशकंदील गावित शैक्षणिक संकुलात दिवाळी फराळ वाटप सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ६ : दिवाळीनिमित्त के. डी. गावित शैक्षणिक संकुल, कोरीट येथे विद्यार्थ्यांसाठी विविध आनंददायी उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी कलाकौशल्यातून आकर्षक आकाशकंदील तयार केले. रंगीत कागद आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करून सुंदर दिवाळी शुभेच्छापत्रे तयार केली. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराने दिवाळीच्या आनंदात विशेष भर पडली. आकाशकंदील तयार करताना विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा सुंदर आविष्कार घडविला. विविध रंग, आकर्षक रचना आणि सजावटीच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या हातांनी आकाशकंदील बनवले. या कृतीतून विद्यार्थ्यांना हस्तकौशल्य, कल्पकता, नियोजन आणि स्वनिर्मितीचा आनंद अनुभवता आला. विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त सुंदर ग्रीटिंग्स तयार करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. आकाशकंदील निर्मिती आणि शुभेच्छापत्रे तयार करण्यासारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सुनीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी फराळ तयार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना चिवडा आणि सोनपापडीचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या गोड फराळाचा आस्वाद घेताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शैक्षणिक संकुलातील शशिकांत पाटील, राकेश पाटील, व्ही. एस. पाटील, विश्वासराव शिरसाठ, रवींद्र सोनवणे, चारुशीला निकम, मीनाक्षी पाटील, ज्योत्स्ना देवरे, जयश्री देवरे, नीता साळुंखे, प्रा. भरत चव्हाण, प्रा. नयना पवार, प्रा. सुनील खाडे, प्रा. स्वाती बारी, प्रा. प्रशांत बोरसे, सुनंदा पाटील, कौशिक बाविस्कर आणि किशोर भिलावे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.