दिपावली निमित्त कचरा संकलनात वाढ

दिपावली निमित्त कचरा संकलनात वाढ
Published on: 
टूडे साठी --------------- दिवाळीनिमित्त कचरा संकलनात वाढ विभागनिहाय बारा अतिरिक्त घंटागाडी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी करण्यात आलेली स्वच्छता व बाजारपेठेतील कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सकाळ, सायंकाळ अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर विभागनिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे अतिरिक्त १२ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन केले जात आहे. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिदिन १०-१५ टन अतिरिक्त कचरा बाजारपेठेतून बाहेर पडतं आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सहा विभागांसाठी जवळपास ४०५ घंटागाड्या कचरा संकलनासाठी आहेत. या घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवले जाते. प्रत्येक घंटागाडीसाठी मार्ग व वेळा निश्चित करून दिल्या आहेत. वेळ किंवा मार्ग चुकल्यास वा नेमून दिलेल्या ठिकाणी घंटागाडी न गेल्यास १० हजार रुपये प्रतिदिन दंडाची तरतूद आहे. दिवाळीनिमित्त घरांसह दुकानांची, तसेच विविध शासकीय वा खासगी आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर साफसफाई मोहीम हाती घेतली जाते. तसेच बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर पडतं असल्याने अतिरिक्त कचरा संकलित करण्यासाठी १२ घंटागाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या मनपाने सुरू केल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून शहरातून दररोज सुमारे ८०० टन कचरा संकलित केला जातो. मात्र दिवाळीमुळे कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.