दिवाळीत दररोज ३० टन कचऱ्याची अधीक भर

दिवाळीत दररोज ३० टन कचऱ्याची अधीक भर
Published on: 
टुडे पान ४, मेन फिचर NSK26H35202 जळगाव : गोलाणी संकुलातील दुसऱ्या मजल्यावर साचलेला कचऱ्याचा ढीग. ............ दिवाळीच्या काळात कचरा संकलनात ३० टनांची वाढ शहरात स्वच्छतेला वेग, व्यापारी संकुलांकडे दुर्लक्ष; ‘बीव्हीजी’ने २८ ट्रॅक्टर केले सुरू सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : दिवाळीच्या सणामुळे शहरात कचऱ्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता आणि कचरा संकलनासाठी यंत्रणा सक्रिय ठेवली आहे. सणापूर्वी दररोज १५० ते १८० टन कचरा संकलित होत होता. दिवाळीच्या काळात या प्रमाणात दररोज सुमारे ७० ते ८० टनांनी वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. वाढीव कचऱ्याचे संकलन करण्यासाठी बीव्हीजी कंपनीकडून ट्रॅक्टरची संख्या ५ ते ७ वरून थेट २८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या कामाला गती मिळाली असली, तरी महापालिकेच्या व्यापारी संकुलांमधे मात्र कचऱ्याचे ढीग प्रशासनाच्या स्वच्छता दाव्यांना आव्हान देत आहेत. दिवाळीच्या काळात घरोघरी साफसफाई, फराळाची तयारी, खरेदी आणि व्यावसायिक उलाढालीमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढते. यंदाही त्याचा परिणाम शहराच्या स्वच्छतेवर झाला. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या बीव्हीजी कंपनीच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू ठेवण्यात आले. विशेषतः ट्रॅक्टरची संख्या वाढविल्याने कचरा उचलण्याच्या कामाला हातभार लागला. वाढलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. संकुलांत ढीग कायम एकीकडे शहरातील कचरा संकलनासाठी यंत्रणा वाढविली जात असताना दुसरीकडे महापालिकेच्या व्यापारी संकुलांमध्ये मात्र कचऱ्याचे ढीग पुन्हा साचू लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने दर रविवारी व्यापारी संकुलांची विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली होती. त्यात काही संकुलांची स्वच्छता केल्यानंतर ही मोहीमच थंडावली. परिणामी, महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केटसह अन्य संकुलांमध्ये पुन्हा अस्वच्छतेची समस्या पुन्हा निर्माण झाली आहे. चौकट दंडात्मक कारवाईचा इशारा हवेतच महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जिवने यांनी व्यापारी संकुलांची पाहणी करून दुकानाबाहेर कचरा टाकणाऱ्या तसेच दुकानात डस्टबीन न ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. सुरुवातीला काही मोजक्या व्यावसायिकांवर कारवाई झाली; मात्र त्यानंतर ही मोहीमही थंडावली. त्यामुळे व्यापारी संकुलांमधील अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील नियमित स्वच्छतेसोबतच व्यापारी संकुलांची विशेष स्वच्छता मोहीम सातत्याने राबविणे आणि नियम मोडणाऱ्यांवर नियमित दंडात्मक कारवाई करणे हे महापालिकेसमोर आता महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.