Nashik News : मालेगावला Silence Zone मध्ये डिजेचा दणदणाट! नागरिकांमध्ये नाराजी

DJ file Photo
DJ file Photoesakal

मालेगाव शहर (जि. नाशिक) : शहरातील अनेक परिसरात जोरदार डिजे वाजवला जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या सायलेन्स झोनमध्ये देखील कुठलीही कारवाईची तमा न बाळगात सर्रास डीजे वाजविला जात आहे.

त्यामुळे या भागातील शांतता सातत्याने भंग होत आहे. मात्र यावर प्रशासनाने तोंडावर बोट ठेवल्याने ओरड करणार तरी कुठे असाच प्रश्न त्यांच्यासह नागरिकांना पडला आहे. ऐन परीक्षेच्या काळात लग्न सराई असलेल्या डिजेच्या तालावर दणदणाट सुरू असून शहरातील रूग्णालयाच्या परिसरातही धुमधडाका जोरदार आहे.

त्यामुळे शांततामय परिसरातील शंभर मीटर मर्यादा हरवत चालली की काय? असा सवाल शहरातील नागरिक करत आहे. (DJ noise in Silence Zone during exam time Discontent among citizens Nashik News)

सध्या लग्नसराई जोरात असल्याने सर्वत्र लाऊडस्पिकरचा आवाज वाढला आहे. आवाजाची मर्यादा निश्चित असतानाच कर्णकर्कश आवाजाचा गोंधळ सर्रासपणे शांतता झोनमध्ये सुर आहे. सायलेन्स झोन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाच्या शंभर मीटरच्या परिघात कुठेही लाऊडस्पीकर किंवा मोठ्या आवाजातली वाद्य वाजवण्यास मनाई आहे.

रूग्णालय, कोर्ट, शिक्षण संस्था या सगळ्या सायलेन्स झोनमध्ये येतात. मात्र याबाबत कुठलीही काळजी किंवा कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

'सायलेन्स झोन' नावाची बाब सद्यःस्थितीत मालेगाव शहरात अजिबात नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन शांतता परिसर निश्चित केलेल्या भागात 'डिजे' चा कर्णकर्कश: धुमाकूळ थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

DJ file Photo
Nashik News : सातपूरच्या वरिष्ठासह सहाय्यक निरीक्षकांची उचलबांगडी

बरेचदा लग्न सराई असलेल्या कुटुंबापेक्षा बाहेरची मंडळी वाढव आवाज म्हणत नाचण्यात दंग होऊन जातात. हृदयविकार संबंधित रूग्ण यांच्या हृदयाला तीव्र आवाजाने हादरे बसून त्रास होतो. छोट्या बालकांच्या कानावर इजा होऊ शकते. त्यामुळे शांतता परिसरात बॅंण्ड व डिजेवर बंधने असावी.

दवाखान्याच्या परिसरात ध्वनिप्रदूषण नियम धाब्यावर बसवून वाजणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. मुळात सायलेन्स झोन व ध्वनिप्रदूषण बाबतीत अतिशय कडक नियम आहेत. शहरातील अनेक ठिकाणच्या जोरदार आवाजामुळे अगदीच अनेक छोट्या कॉलनीत दणदणाट रात्री दहानंतर सुरू असतो. आसपासच्या परिसरातील अन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

"डिजे सारख्या वाद्यांचा दणदणाट इतका आहे की परिसर हादरतो. शहरात शांतता झोन नावाची बाब अंमलात आहे की नाही? वयोवृद्ध व हृदय विकारांचे रूग्ण यांना जोराचा आवाज त्रासदायक ठरतो. याबाबत संबंधित यंत्रणेने जागरूकता व प्रबोधनात्मक कारवाई करण्याची गरज आहे."

- डॉ.टी.पी.देवरे, बारा बंगला, मालेगाव.

DJ file Photo
Nashik News : मनपासह शासनाच्या पोर्टलवर सव्वा सातशे तक्रारी प्रलंबित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com