Nashik News : ‘पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या?’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या ?
‘पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या?’

‘पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या?’

सिडको : ‘पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं फायर है मैं’ या ‘पुष्पा : द राईज’ या तमीळ चित्रपटाच्या एका डायलॉगने केवळ तरुणाईलाच नव्हे, तर ज्येष्ठांनाही भुरळ घातली आहे. त्याची चर्चाही सर्वत्र जोरदार रंगली आहे.

हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडे कामाला असलेले ६२ वर्षीय विजय खराटे सिडकोतील हनुमान चौकात वास्तव्यास आहेत. पूर्वी ते उसाचे गुऱ्हाळ चालवून आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी भरत असत. २७ वर्षांपासून ते चुंभळे परिवाराचे सदस्य (कार्यकर्ते) आहेत. टिक-टॉक, मॅक्स टकाटक, रोपोसो आणि इन्स्टाग्रामवर सध्या आगळेवेगळे व चाहत्यांच्या पसंतीस पडतील, असे हजारो व्हिडिओ बनविताना ते नेहमीच दिसतात. हिंदी-मराठी गाणे, प्रसिद्ध डायलॉग, विनोदी चुटकुल्यांच्या सादरीकरणामुळे ते संपूर्ण सिडको परिसरात नव्हे, तर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहेत. तरुणांनाही लाजवेल, अशा सादरीकरणामुळे या ६२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीमुळे त्यांचे लाखोच्या संख्येने फॅन्स फॉलोअर्स झाले आहेत.

हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

नुकताच तमीळ भाषेतील पुष्पा : द राईज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. कोट्यवधी रुपयांचा गल्ला त्याने बॉक्स ऑफिसवर जमविला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेला कलाकार अल्लू अर्जुन याला हिंदीत आवाज दिलाय तो मराठी चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदे याने. यातील एका हिंदी डायलॉगने सध्या संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. आज हाच डायलॉग घेऊन विजय खरोटे यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांनीही त्यास मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली असून, त्यास डोक्यावर घेतले आहे.

लाखोने चाहतावर्ग

६२ वर्षीय विजय खरोटे यांनी आतापर्यंत सात-आठ सेकंदांचे हजारो व्हिडिओ तयार केले आहेत. टिक-टॉकवर त्या वेळी मिलियन (१०० लाख) फॉलोअर्स होते. नंतर मॅक्स टकाटक, रोपोसो आता इन्स्टाग्रामवर लाखोने त्यांचा चाहतावर्ग आहे.

Web Title: Do You Think Flower After Hearing Name Pushpa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top