डॉक्टर ‘रिल्स’ला तर, व्यावसायिक ‘टेंडर’ला भाळले

डॉक्टर ‘रिल्स’ला तर, व्यावसायिक ‘टेंडर’ला भाळले
Published on: 
डॉक्टर ‘रिल्स’ला तर, व्यावसायिक ‘टेंडर’ला भाळले सायबर भामट्यांकडून दोघांच्या खात्यांवर डल्ला; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : ​‘रिल्स’ पाहत असताना कधी खिसा रिकामा होईल सांगता येत नाही, याचा प्रत्यय एका डॉक्टर महाशयांना आला असून, तिकडे ‘टेंडर’ मिळवण्याच्या नादात एका व्यावसायिकाचेही चांगभलं झाले आहे. इन्स्टाग्रामवर ३० दिवसांत ५० लाखांच्या परताव्याचे आमिष दाखवून डॉक्टरला १५ लाखांना गंडा घातला, तर दुसरीकडे बसेसच्या ‘सीट फोम’चे टेंडर मिळवून देण्याचे खोटे स्वप्न दाखवून व्यावसायिकाच्या खिशातून तब्बल ४० लाखांहून अधिक रुपयांची रक्कम लांबवण्यात आली. कमोदनगर येथील फिर्यादीला सप्टेंबर २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर ‘अवंतिका इंडस्ट्रीज’च्या जाहिरातीची माहिती मिळाली. कंपनीचे प्रतिनिधी प्रमोद कुमार (रा. दिल्ली) यांनी चांगल्या नफ्याचे स्वप्न दाखवून १५ लाख रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादीने स्वतःच्या युनियन बँकेतून १२ लाख १० हजार, दाजी चेतन शेवाळे यांच्या खात्यातून १ लाख ९९ हजार ५०० आणि फोनपेद्वारे ९० हजार ५०० रुपये असे एकूण १५ लाख रुपये अवंतिका एंटरप्रायजेसच्या बँक खात्यावर वर्ग केले. संशयितांनी डिमांड ड्राफ्ट तयार केल्याचे सांगितले मात्र तो मिळण्यापूर्वीच ते पसार झाले. वडीलांच्या आजारपणामुळे तक्रारीस उशीर झाल्याने अखेर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत गुजरात राज्य परिवहन महामंडळ आणि मारुती उद्योग कंपनीच्या बससाठी सीट फोम’चे टेंडर मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून, विविध कागदपत्रांच्या व ईएमडी आणि टेस्टिंग फीच्या नावाखाली तब्बल ४० लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात भामट्यांनी ‘gsrtctender831@gmail.com’ व ‘marutiudyogguj@gmail.com’ या बनावट ईमेल आयडीचा आणि मोबाईल क्रमांकाचा वापर करून स्वतःची खोटी ओळख निर्माण केली. गुजरात परिवहन आणि मारुती कंपनीच्या नावाखाली टेंडर मिळवून देण्याचे नाटक रचले. संशयितांनी विविध कारणांचे व खोट्या बहाण्याने फिर्यादीकडून ३९ लाख ७३ हजार रुपयांहून अधिक रक्कम विविध बँक खात्यांवर वर्ग करण्यास भाग पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com