डाॅक्टर नववधूची होणार 'कौमार्य चाचणी'; नाशिकमधील लांच्छनास्पद प्रकार | virginity test | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bride

डाॅक्टर नववधूची होणार कौमार्य चाचणी; लांच्छनास्पद प्रकार | Nashik

 नाशिक : देश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगती करत असला तरी देशाचे सामाजिक वास्तव हे दाहक आहे. नाशिकही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाने जात पंचायतीची अशी भयानक कुप्रथा समाजासमोर आणली आहे. जात पंचायतच्या पंचांकडून डाॅक्टर असलेल्या नववधुची लग्नाच्या रात्री कौमार्य चाचणी (doctor bride virginity test) घेण्यात येणार आहे.

लांच्छनास्पद! नाशिकमध्ये डाॅक्टर नववधूची होणार कौमार्य चाचणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून जात पंचायत मूठमाती अभियान चालवतो. या अंतर्गत विविध समाजातील  जातपंचायतींद्वारे पुरस्कृत   अनेक अनिष्ट,अघोरी अन्यायकारक रूढीं,  प्रथां समितीने थांबवल्या आहे. समितीच्या पुढाकाराने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा सुद्धा संमत झालेला आहे. असे असतानाही, आजही एका समाजात लग्नानंतर वधूची कौमार्य परीक्षा घेतली जाते. जातपंचांनी दिलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर  वर व वधू यांनी झोपायचे असते. त्यावर रक्ताचा लाल डाग पडला तरच, ते लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा ते लग्न अमान्य करून, अशा वधूस मारहाण करून, तिच्या पालकांना शिक्षा व जबर आर्थिक दंड केला जातो. दंडाची रक्कम न भरल्यास तिच्या परिवाराला वाळीत टाकले जाते. ती थांबविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्न करत आहे.

हेही वाचा: ST संपाचा आणखी एक बळी? पेठ आगारातील बसचालकाची आत्महत्या | Nashik

धक्कादायक! वधूची कौमार्य परीक्षा

येत्या रविवारी 21 नोव्हेंबरला सायंकाळी  नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हाॅटेलमध्ये उच्च शिक्षित वधु -वराचा विवाह सोहळा होत आहे. त्यात वधूची कौमार्य परीक्षा घेण्यात  येणार असल्याचा तक्रार अर्ज अंनिसला प्राप्त झाला आहे. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. व अशी कुप्रथा थांबविण्याची विनंती करण्यात आली आहे.राज्य सरकार कडून अशा कुप्रथा थांबविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतू परंपरेच्या नावाखाली स्त्रीच्या चारित्र्यावर गदा येत आहे व मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने अंनिस उच्च न्यायालयात या कुप्रथेविरूद्ध याचिका दाखल करणार आहे. या मोहिमेत डाॅ. टी .आर .गोराणे, कृष्णा चांदगुडे, अॅड.समीर शिंदे, नितीन बागुल, महेंद्र दातरंगे, कृष्णा इंद्रीकर, संजय हराळे, दिलीप काळे आदी कार्यकर्ते सामिल झाले आहे.

हेही वाचा: ऑस्ट्रियात संपूर्ण लॉकडाउन, जर्मनीही तयारीत; भारतीयांनो सावधान!

loading image
go to top