esakal | भटक्या कुत्र्यांनी आणला मृतदेहाचा एक भाग; परिसरात खळबळ

बोलून बातमी शोधा

death

भटक्या कुत्र्यांनी आणला मृतदेहाचा एक भाग; परिसरात खळबळ

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : भटक्या कुत्र्यांनी स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा एक भाग आणून टाकल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. काय घडले नेमके?

धक्कादायक बाब बघायला मिळाल्याने एकच खळबळ

कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत अंबड गावातील स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडून त्यातील पायाचा एक भाग भटक्या कुत्र्यांनी गावातील चौकात आणून टाकल्याची धक्कादायक बाब येथे बघायला मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंबड गावातील मुख्य रस्त्याच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीतून भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या पायाचा भागच उचलून आणत गावाच्या चौकात आणून टाकला. चौकात बसलेल्या ग्रामस्थांना हा प्रकार बघून अंगावर काटा आला. याबाबत त्यांनी चौकशी केली असता स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या शरीराचा पायाचा भाग आणल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यातील काही जणांनी नगरसेवकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिउत्तर दिले नाही. या समस्येमुळे स्मशानभूमीत कोण येते आणि कोण जाते, याची पुरेशी नोंद ठेवली जात नाही. तसेच कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. संबंधित नातेवाईक मृतदेहाला अग्निडाग देऊन लगेच निघून जातात. तोच दुसरे त्या ठिकाणी हजर होतात.

अंबड गावातील स्मशानभूमीत दिवस-रात्र मृतदेहांचे दहन केले जाते. या ठिकाणी कुठल्या प्रकारची नोंद होत नाही. हा प्रकार डोळ्यांनी बघितला. त्यामुळे अंगावर शहारे आले. यासंदर्भात संबंधित नगरसेवकांना फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणी फोनही उचलला नाही. आता असे प्रकार होत असेल तर भविष्यात काय होईल, याची चिंता सर्वांना लागली आहे. या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही ग्रामस्थ यानिमित्ताने करत आहोत. - भारत आहेत, ग्रामस्थ, अंबड