संक्षिप्त
विवाहिता पैशांसाठी
छळ; गुन्हा दाखल
जळगाव : माहेरून पैसे आणावे, यासाठी अश्विनी पुष्कर सावदेकर (वय २६) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. हा प्रकार गेल्या तीन (वर्ष- २०२३) पासून सुरू होता. या प्रकरणी विवाहितेने रविवारी (ता. ११) एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती पुष्कर सावदेकर याच्यासह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
महिलेचा इन्स्टाग्राम
आयडी केला हॅक
जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या वैशाली रोहिदास झाल्टे (वय ३०, रा. भगीरथ कॉलनी) यांचा इस्टाग्राम आयडी अज्ञाताने बंद करून डाटादेखील गायब केला. हा प्रकार (ता. १०) घडला. या प्रकरणी झाल्टे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------
घरात गुरांचे अवशेष
बाळगल्याप्रकरणी गुन्हा
जळगाव : विक्रीसाठी घरात गुरांचे अवशेष ठेवल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी रविवारी (ता. ११) काट्याफैल परिसरात कारवाई करत अवशेष जप्त केले. शनिपेठ पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून समीर खान इकबाल खान (वय २२, रा. काट्या फाइल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक उमेश ठाकूर तपास करीत आहेत.
---
सुसाट रिक्षाच्या
धडकेत प्रौढ जखमी
जळगाव : भरधाव रिक्षाने धडक दिल्यामुळे पादचारी मनोहर हिरामण देवरे (वय ३०, रा. शिवाजी नगर) जखमी झाले. हा अपघात (ता.११) इच्छादेवी चौक ते आकाशवाणी चौकादरम्यान झाला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार सतीश देसले तपास करीत आहेत.
----