धुळे ः टुडे ३ साठी
--
विवाहितेचा छळ;
१३ जणांविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करणे, तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
कसरावद (जि. खरगोन, मध्य प्रदेश) येथील ३३ वर्षीय महिलेच्या (ह. मु. रा. दोंडाईचा, ता. शिंदखेडा) फिर्यादीनुसार १२ फेब्रुवारी २०१२ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ऑगस्टअखेर अंकित वर्मा याने महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो निमिष, महावीर, काकू, सासू यांना पाठविला. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत निमिष याने शारीरिक संबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. २६ सप्टेंबरला स्त्रीधनाचे दागिने घेऊन जात असल्याचा व्हिडिओ केल्याच्या कारणावरून पती स्वतंत्र जैन व दीराने मारहाण केली. यात महिलेच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मुलालाही मारहाण झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पतीसह सासरा, सासू, दीर, काका सासरे, चुलत दीर, काकू सासू, देराणी आदींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.