दोंडाईचात गरबा महोत्सव

दोंडाईचात गरबा महोत्सव
Published on: 
NGL26B04105 दोंडाईचा : येथील रोटरी क्लबतर्फे सुरू असलेल्या गरबा महोत्सवात सहभागी महिला व तरुणी. -------------- गरबा महोत्सवात महिलांसह तरुणाईचा सहभाग दोंडाईचा रोटरी क्लबतर्फे आयोजन; आकर्षक भेटवस्तू सकाळ वृत्तसेवा निमगूळ, ता. १५ : दोंडाईचा येथील रोटरी क्लब व भक्ती गरबा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान दादासाहेब रावल स्टेडियमवर गरबा उत्सवाचे आयोजन केले असून, प्रेक्षक व महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शारदाबेन शहा यांनी ५० वर्षांपूवी भक्ती गरबा मंडळ स्थापन केले असून, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन व्हावे, हा हेतू होता. १३ वर्षांपासून रोटरी क्लब व भक्ती गरबा मंडळातर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. परिसरातील माता- भगिनींना गरबा खेळण्यासाठी तसेच हा उत्सव पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो. दरम्यान, शहरातील मान्यवर या महोत्सवाला भेट देत असून, दररोज गरबा खेळणाऱ्या महिलांसाठी आकर्षक वेशभूषा, उत्कृष्ट गरबा डान्स करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भेट वस्तू दिली जाते. शारदाबेन शहा, हेतल शहा, पौर्णिमा शहा, वैशाली शहा या मुलींना गरबा नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्या गरबा खेळण्यासाठी महिला व तरुणींना मार्गदर्शन करतात. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश माहेश्वरी, सचिव अक्षय बोरसे, प्रोजेक्ट चेअरमन अनिश शाह, उपाध्यक्ष पंकज कवाड, हर्षित पटेल, सचिन अग्रवाल, अमर इंदानी, गुलाम शेख, डॉ. चेतन बच्छाव, डॉ. नितीन बिराडे, डॉ. अविनाश मोरे, डॉ. जितिन अग्रवाल, राकेश जयस्वाल, भूषण माहेश्वरी व सदस्य परिश्रम घेत आहेत. पोलिस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ------- गेल्या ५० वर्षापासून स्थापन केलेल्या भक्ती मंडळाच्या माध्यमातून अनेक महिला व युवतींना एक व्यासपीठ निर्माण झाले आहे. भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. शेकडो महिला व तरुणींचा सहभाग असल्याने त्यांच्या कला- गुणांना वाव मिळत आहे, याचा आनंद आहे. - शारदाबेन शहा, अध्यक्ष, भक्ती गरबा मंडळ, दोंडाईचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com