धुळे : टुडे पान ४ साठी....
--
दोंडाईचाच्या तरुण चित्तेची
कुस्ती स्पर्धेसाठी निवड
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : धरणगाव (ता. जळगाव) येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत दोंडाईचास्थित श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तृतीय वर्ष सिव्हिल अभियांत्रिकीचा विद्यार्थी तरुण चित्ते याने नंदुरबार विभागाच्या संघातून खेळताना प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेतून ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली.
राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नांतून आणि स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळत आहे. तरुणच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. ए. वाय. कागणे यांचे मार्गदर्शन झाले. तरुणच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव सी. एन. राजपूत, सहसचिव (विस्तार) आर. टी. गिरासे, सहसचिव डी. एन. जाधव, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. पटेल, तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम. डी. पाटील, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य बी. डी. गिरासे आणि तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य के. डी. सोनार यांनी कौतुक केले.