धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
- धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त व मास्क हेड - दोंडाईचात घरफोडी; दागिने लांबविले धुळे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील सिंधी कॉलनी परिसरात घरफोडी करून चोरट्यांनी २४ हजार ४०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने नेले. योगीता भोजेसिंग जाधव यांचे घर २८ सप्टेंबरला सायंकाळी पाचपासून २९ सप्टेंबरला सकाळी दहापर्यंत बंद होते. या काळात दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर कपाटाचे लॉकर फोडून सोन्याची मंगलपोत, टिकली, मातेच्या मूर्तीची सोन्याची नथ, सोन्याचे मणी, मंगलसूत्र, चांदीचे कडे, गोफ आणि मुकूट, असा ऐवज नेला. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - शेतीच्या वादातून भावंडांना मारहाण धुळे : शिरूड (ता. धुळे) शिवारात शेतीच्या वादातून स्वप्निल सुभाष शिरूडकर आणि त्यांचे लहान भाऊ अमित यांना तिघांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना आठ ऑक्टोबरला दुपारी दोनच्या सुमारास शिरूड शिवारातील गट क्रमांक ६८६ मधील शेतात घडली. स्वप्निल यांना भूषण नाना पगारे, गणेश विश्वास पगारे आणि गोलू राजेंद्र पगारे (तिघे रा. विंचूर, ता. धुळे) यांनी शेतजमिनीच्या कारणावरून वाद घालत मारहाण केली. भावाला सोडवण्यासाठी आलेल्या अमित यांनाही मारहाण केली. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - दुचाकीची चोरी; अल्पवयीन ताब्यात धुळे : शहरातील रेल्वेस्थानक परिसरातून दुचाकी नेणाऱ्या तिघांपैकी दोन अल्पवयीन संशयितांना जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी सुनील पाथरवट यांनी महाराणा प्रताप चौकाजवळील श्रीराम पेन सेंटर परिसरात पकडले. तिसरा पसार झाला. मात्र, नागरिकांच्या मदतीने त्यालाही पकडण्यात आले. चोरीला गेलेली दुचाकी आणि दोघा अल्पवयीनांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघे शहादा (जि. नंदुरबार) येथील असल्याचे सांगण्यात आले. दुचाकी मालकाने रेल्वेस्थानक चौकातून दुचाकी चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू नोंद झाली. - हातभट्टीवर छापा; लाखाचा मुद्देमाल जप्त धुळे : पिंपरी (ता. धुळे) शिवारातील नाल्याजवळ सुरू असलेल्या हातभट्टीवर मोहाडी पोलिसांनी छापा टाकून एक लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एस. आर. मोरे (रा. पिंपरी, ता. धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कारवाईत जमिनीत गाडून ठेवलेले प्रत्येकी शंभर लिटर क्षमतेचे १८ ड्रम आणि त्यातील एकूण एक हजार ८०० लिटर गूळ- रसायनमिश्रित वॉश जप्त केला. तसेच, पेटत्या चुलीवरील सहा पत्र्याचे ड्रम, पाच प्लास्टिक कॅनमधील २०० लिटर तयार हातभट्टी दारू, सहा अ‍ॅल्युमिनियमची पातेली, आठ मातीची भांडी, नळ्या आणि अन्य साहित्य जप्त केले. हवालदार रजनी नाईक यांच्या फिर्यादीनुसार मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू धुळे : गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना देवपूर परिसरात घडली. दशरथ टेमा आर्या (वय ३५, रा. बुलवानिया, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे. सात ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या दरम्यान देवपुरात कल्याणी लॉन्सजवळील शिवाई कॉलनी परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दशरथ याचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. - प्रकृती बिघडल्याने ट्रकचालकाचा मृत्यू धुळे : शहादा (जि. नंदुरबार) येथील ट्रकचालक फरीद शहीद पिंजारी (वय ३९) यांचा छातीत दुखू लागल्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाला. दहा ऑक्टोबरला दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी शहरातील शंभर फुटी रोडवरील आझाद ट्रान्सपोर्टजवळ ट्रक उभा केला होता. ट्रकमध्ये थांबलेले असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. ही बाब लक्षात येताच ट्रान्स्पोर्टचे मालक सलीम शेख यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com