NGL26B04123
दोंडाईचा : येथील रोटरी स्कूलच्या क्रिकेट संघाला पारितोषिक देताना मान्यवर.
--------
दोंडाईचा रोटरी स्कूलच्या
क्रिकेट संघाचे स्पर्धेत यश
निमगूळ, ता. २१ : टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन धुळे व हस्ती स्कूल ऑफ ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मानवमित्र स्व.कांतीलालजी जैन यांच्या जयंतीनिमित्त हस्ती स्कूलच्या मैदानावर झालेल्या सतरा वर्ष वयोगटातील धुळे जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि निवड चाचणीत दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. यातील पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेत महिपाल राजपूत, नावेद बेलदार, सुमित राजपूत, तनिष्क पाटील, आदित राजपूत, आयुष्यमान वाडिले, सिद्धेश सोनार, विराट दयेकर, उदय ओतारी, रियांश राजपूत यांनी सर्वोत्तम गोलंदाजी आणि फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा जोरावर मर्यादित षटकांत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे आणि साक्री तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदविला होता. या संघाला कांतीलाल जैन स्मृती चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संघातून धाराशिव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महिपाल राजपूत, नावेद बेलदार, सुमित राजपूत, आयुष्यमान वाडिले, सिद्धेश सोनार यांची निवड करण्यात आली.
खेळाडूंना क्रीडाशिक्षक अजय हजारे, सुजय पवार, दिनेश सोनीस यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकर, प्राचार्य श्रुतिरंजन बारिक, समन्वयक प्रशांत जाधव यांनी कौतुक केले.