डोगराळेच्या आठवणीने डोंगराळेकर सुन्न

डोगराळेच्या आठवणीने डोंगराळेकर सुन्न
Published on: 
फोटो -16112 डोंगराळे : गावात असलेली शांतता ----- पीडिताच्या आठवणीने गहिवरले डोंगराळेकर जलील शेख : सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १६ : डोंगराळे (ता.मालेगाव) येथे सव्वाचार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खुनाने अख्खा गाव सुन्न झाला होता. तब्बल अकरा महिन्यानंतर जलदगती न्यायालयाने शेखर उर्फ विजय खैरनार या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्याने चिमुकलीच्या आठवणीने पुन्हा जाग्या झाल्याने गावकरी गहिवरले. एकीकडे नराधमाला फाशी झाल्याचा आनंद आहे तर दुसरीकडे गावातील हसती खेळती चिमुकली कायमची सोडून गेल्याचे दु:ख गावकऱ्यांना आहे. मालेगाव- कुसुंबा महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील शेवटचे गाव म्हणून डोंगराळे ओळखले जाते. गावातील लोकसंख्या जेमतेम साडे पाच हजाराच्या घरात आहे. येथे शाळेत जाणारी सुमारे दीड हजार मुले-मुली आहेत. १९५६ पासून येथे ग्रामपंचायत कार्यरत आहे. सात दशकात पहिल्यांदाच सव्वाचार वर्षीय चिमुकलीवर लैगिंक अत्याचार करून तिचा करदोड्याने खून करण्याची घटना घडली. या घटनेने डोंगराळेसह परिसर सुन्न झाला होता. घटनेनंतर अनेक दिवस गावतील चुली पेटल्या नव्हत्या. पीडिताच्या सवंगड्यांमध्ये दीर्घ काळ भितीचे वातावरण होते. आरोपीला फाशीची शिक्षा जाहीर झाली तरी पिडीत कुटुंबियांच्या गल्लीत शांतता होती. मुलीचा मृत्यू होऊन अकरा महिने झाले तरी आई - वडीलांना ती कधीतरी येईल असा भास होत आहे. तसेच पीडिताच्या वडिलांनी न्यायालयात अश्रू ढाळत सांगितले. अनेकजण निकाल ऐकण्यासाठी शहरात आले होते. गावात दुपारपर्यंत बंदोबस्त होता. लहान मुलांचे बाहेर पडणे जिकरीचे चिमुकलीवर अत्याचार व तिचा निर्घृण खून झाल्यापासून गावातील पालकांना मुलांच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. भितीपोटी अनेक कुटुंबीय लहान मुला-मुलींना बाहेर पाठविण्यास धजावत नाहीत. गावात तीन शाळा असून आरोपी शेखर उर्फ विजय खैरनार याच्या घराजवळच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. न्यु इंग्लिश स्कूल तसेच गावाजवळच इंग्रजी माध्यमांची शाळा आहे. मुली व मुलांना सोडणे व घेण्यासाठी पालक शाळेतच जातात. मुलांना शाळा सुटल्यावर बाहेर न पडण्याची ताकीद पालकांनी दिली आहे. अकरा महिन्यापासून गावात सण- उत्सव नाहीच. घटना घडल्यानंतर डोंगराळे गावातील ग्रामस्थांनी अकरा महिने कोणतेच सण, उत्सव साजरे केलेे नाहीत. पुढील महिन्यातदेखील दिवाळी साजरी करणार नसल्याचे ग्रामस्थांनी सागीतले. डोंगराळे गाव परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू विकली जाते. २१ ऑक्टोबरला होणाऱ्या ग्रामसभेत तरुण एकजुटीने दारूबंदीचा निर्णय घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com