टुडे पान २ साठी---- आर्टिकल ( जाहिरात पुरस्कृत) हा उल्लेख करणे.
-----------------
डॉ.अक्षय गांगुर्डे ः KLW26B09769
------------
KLW26B09768
कळवण ः येथील डॉ. गांगुर्डे हॉस्पिटलची इमारत
-----------
स्वप्नांना ज्ञानाची जोड, यशाला सेवाभावाची दिशा
-----------
वटार (ता. बागलाण) येथील शिक्षणप्रेमी डॉ. दौलतराव राघो गांगुर्डे यांचे लहान चिरंजीव डॉ. अक्षय गांगुर्डे व पत्नी डॉ. समृद्धी गांगुर्डे दंतचिकित्सक आहेत. डॉ. दौलतराव गांगुर्डे यांची कहाणी केवळ एका शिक्षण संस्थेच्या विस्ताराची नाही, ती एका संघर्षमय प्रवासाची, जिद्दीची आहे. त्यातून प्रेरणा घेत डॉ. अक्षय आणि डॉ. समृद्धी कळवण येथे ‘गांगुर्डे हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेन्टर’ च्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु करत आहेत. त्यानिमित्त...
-------------
यश म्हणजे केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण करणे नव्हे, तर आपल्या ज्ञानातून दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे होय ही भावना मनाशी जपत डॉ. अक्षय गांगुर्डे यांची वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण, ज्ञानाची अखंड साधना, आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी आणि रुग्णसेवेप्रति असलेली निष्ठा या बळावर त्यांनी स्वतःची व्यावसायिक ओळख घडवली आहे. डॉक्टर होण्यापासून गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांच्या उपचारांची जबाबदारी स्वीकारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ पदव्यांचा आलेख नाही; तो ज्ञान, संवेदनशीलता, धैर्य आणि माणुसकी यांची सांगड घालणारा अनुभव प्रवास आहे.
नाशिक येथे ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावर्डे (रत्नगिरी) येथील बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी जनरल मेडिसीन ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. या शैक्षणिक प्रवासाने रोगनिदान, उपचारनियोजन आणि गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितींचे आकलन यांसाठी भक्कम पाया घातला. सटाणा येथील यशवंत हॉस्पिटलमधील अनुभव आणि रतन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामातून त्यांना आरोग्यसेवेचे विविध पैलू समजून घेता आले. पुढे अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेची विशेष आवड जोपासत त्यांनी इंडियन डिप्लोमा इन क्रिटिकल केअर मेडिसिनचे प्रशिक्षण घेतले. पुण्यातील सह्याद्री मणिपाल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर फिजिशियन म्हणून काम करताना गंभीर रुग्णांचे व्यवस्थापन, आपत्कालीन निर्णय आणि जीवनरक्षक उपचारांच्या प्रक्रियेत योगदान देण्याची संधी त्यांना मिळाली. या प्रत्येक अनुभवाने त्यांच्या ज्ञानाला धार दिली आणि सेवाभावाला अधिक व्यापक अर्थ दिला. स्वप्नांना ज्ञानाची जोड आणि ज्ञानाला सेवाभावाची दिशा देत डॉ. अक्षय गांगुर्डे यांची ही वाटचाल आशावादी, संवेदनशील आणि समर्पित भावनेने पुढील ध्येयांकडे सुरू आहे. (संकलन ः अंबादास देवरे, सटाणा)
-----------------