डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
Published on: 
NSK26H34683 जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ अभिवादनप्रसंगी बापूराव पानपाटील, डॉ. मिलिंद बागुल, राजू न्हायदे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, डॉ. बी. डी. शिरसाठ आदी. ------ डॉ. बाबासाहेब यांच्या शिक्षणाची सुरवातच आमची गुलामीतून मुक्तता -- डॉ. सत्यजित साळवे : आंबेडकरांना शाळा प्रवेशदिनी अभिवादन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुभवसंपन्न जीवनातून शिक्षणाचे सांगितलेले महत्व, त्यांनी शाळेत प्रवेश केलेल्या दिवसापासूनच आमची गुलामीतून मुक्तता होण्याला सुरू झाल्याचे मत उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी पाळधी (ता.धरणगाव) येथील बौद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी आर. टी. सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल, बापूराव पानपाटील, मुकुंद नन्नावरे, सुनील सोनवणे, जगदीश सपकाळे, रत्नदीप नन्नवरे, सुनील आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शतकांनुशतकांचा अन्याय, अत्याचाराचा, त्यासोबतच शोषित वंचितांचा गुलामीचा इतिहास बदलविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शालेय प्रवेश व त्यासोबतच इतिहासातून आपल्या अनुभवसंपन्न जीवनातून केले. सामाजिक क्रांतीची, शैक्षणिक क्रांतीची पाऊलवाट निर्माण करण्याचे कार्यही बाबासाहेबांच्या शैक्षणिक जीवनातून लक्षात येत असल्याचे मत डॉ. बी. डी. शिरसाठ यांनी धरणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमानिमित्तात व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद बागुल होते. जय महाराष्ट्र संघटनेचे पालक अध्यक्ष आर. टी. सोनवणे, सुनील सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे, राजू न्हायदे, रामकृष्ण पाटील, संकेत शिरसाट आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.