डॉ. बाबासाहेबांनी गावास दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा

डॉ. बाबासाहेबांनी गावास दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा
Published on: 
NSK26H33370 भालोद (ता.यावल) : बुद्धविहारात गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भालोद भेटीची आठवणनिमित्त आयोजित कार्यक्रमात जयसिंग वाघ, गोपाळ भालेराव, प्रदीप सपकाळे, मुकुंद सपकाळे, बाबुराव वाघ, डॉ. उल्हास तासखेडकर, डॉ. प्रकाश वानखेडे, ॲड. आनंद कोचुरे, डॉ. चंद्रकांत भालेराव आदी. ------------ भालोदला महामानव भेटीचा प्रेरणास्तंभ उभारावा --- जयसिंग वाघ : डॉ. बाबासाहेबांनी गावास दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा सकाळ वृत्तसेवा यावल, ता. २३ : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ ऑक्टोबर १९२९ला शासकीय कामकाजाचा भाग म्हणून भालोद (ता.यावल) येथील न्यू इंग्लिश स्कूलची पाहणी करून शाळेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करणारा अभिप्राय शाळेच्या दप्तरात नोंदविला आहे. शाळेच्या तपासणीसाठी बाबासाहेब आले असता, भालोदच्या जनतेने त्यांचे जोरदार स्वागत केले. बाबासाहेबांनी जनतेला मार्गदर्शनही केले. बाबासाहेबांची ही भालोद भेट प्रेरणादायी असून गावात प्रेरणास्तंभ उभारण्याची मागणी प्रसिद्ध साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते जयसिंग वाघ यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भालोद भेटीची आठवण म्हणून भीम स्मृती संवर्धन समितीतर्फे भालोद येथील बुद्धविहारात गुरुवारी (ता.२२) आयोजित अभिवादन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून श्री. वाघ बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळ भालेराव होते. याप्रसंगी प्रदीप सपकाळे (रावेर), मुकुंद सपकाळे, बाबुराव वाघ, डॉ. उल्हास तासखेडकर, डॉ. प्रकाश वानखेडे, ॲड. आनंद कोचुरे, डॉ. चंद्रकांत भालेराव उपस्थित होते. श्री. वाघ पुढे म्हणाले की, १९२९ मध्ये बाबासाहेब हे ओएचबी स्टार्ट समितीचे सदस्य व मुंबई विधान परिषदेचे सदस्य होते. अस्पृश्य व आदिवासी समाजाचे सामजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाची कारणे अभ्यासण्यासाठी ते भालोद येथे आले आहेत. चौकट सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन अध्यक्षीय भाषणात गोपाळ भालेराव यांनी प्रेरणास्तंभ उभारण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी बोलताना दिले. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नथू अहिरे यांनी केले. डॉ. गौतम नन्नवरे, डी. आर. वानखेडे, चेतन नन्नवरे, दिलीप सपकाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अशोक सैंदाणे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश भालेराव यांनी आभार मानले.
Marathi News Esakal
www.esakal.com