धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 31245
मोराणे (ता. धुळे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत झालेल्या रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी. शेजारी प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, प्रा. डॉ. मेघावी मेश्राम आदी.
--
समाजकार्य महाविद्यालयात
रांगोळी स्पर्धा उत्साहात
--
सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थिनींचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : पुणेस्थित समता शिक्षण संस्था संचलित मोराणे (ता. धुळे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने राज्य शासनाच्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धा शनिवारी (ता. ३) झाली. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी सहभाग घेत ‘बेटी बचाव बेटी पढाव, विकसित भारत-२०४७’ या विषयांवर रांगोळी सादरीकरण केले.
प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थिनींनी काढलेल्या रांगोळीचे परीक्षण केले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. प्रिती वाहणे आणि आम्रपाली सूर्यवंशी यांनी भूमिका पार पाडली. रांगोळी स्पर्धेमध्ये रोशनी वाघ हिने प्रथम क्रमांक, देवयानी पाटील हिने द्वितीय, जागृती साळुंखे हिने तृतीय, तर दामिनी राठोड हिने उत्तेजनार्थ स्थान पटकावले. या सर्व बक्षीसपात्र विद्यार्थिनींचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी कौतुक केले. विद्यार्थी विकास विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मेघावी मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले.