डॉ. भरत बोरोले यांचा राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

डॉ. भरत बोरोले यांचा राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव
Published on: 
NSK26H35319 नागपूर : आयोजित ‘मॅस्टाकॉन-२०२६’ सोहळ्यात राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्कार स्वीकारताना डॉ. भरत बोरोले. समवेत डॉ. जयेश लेले, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. रश्मी मेहता, डॉ. मंजुषा गिरी आणि डॉ. स्नेहल फेगडे. ------- डॉ. भरत बोरोले यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स ॲप्रिसिएशन अवॉर्ड फॉर बेस्ट सेक्रेटरी – बिग ब्रँच (२०२५-२६)’ हा राज्यस्तरीय पुरस्कार आयएमए जळगाव शाखेचे मानद सचिव डॉ. भरत बोरोले यांना प्रदान करण्यात आला. नागपूर येथील आयएमए हाऊस येथे आयोजित ६६ व्या वार्षिक राज्य परिषद ‘मॅस्टाकॉन-२०२६’ व ‘आयएमएकॉन-२०२६’ या भव्य सोहळ्यात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्‌घाटन व पदग्रहण समारंभास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार तुषार राठोड, आयएमएचे राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले तसेच माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यात आयएमए महाराष्ट्रचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयेश लेले, नवनिर्वाचित राज्याध्यक्षा डॉ. मंजुषा गिरी आणि राज्य सचिव डॉ. रश्मी मेहता यांच्या हस्ते डॉ. भरत बोरोले यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. संजय कदम, कार्यकारी सदस्य डॉ. अनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे, आदी उपस्थित होते. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.