Nashik : आयुक्त साहेब गंभीर व्हा, आम्हालाही चौकशीचे अधिकार! डॉ. पवारांकडून आयुक्तांची झाडाझडती घेत तंबी

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Malegaon Municipal Corporation latest marathi newsesakal

Covid Mock Drill : मालेगाव महापालिकेचे आयुक्त आरोग्य आणि कोविडसारख्या विषयांवर गंभीर नाहीत. आरोग्य आणि कोविडसारख्या बैठकांना ते वारंवार गैरहजर असतात. आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तर देणे, रिपोर्टिंग करणे टाळतात.

त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Dr bharati pawar action against malegaon municipal commissioner Nashik news)

केंद्रीय आरोग्य विभागाने सोमवारी (ता. १०) कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी देशात एकाच वेळी मॉकड्रिल घेतले. त्यात रुग्णालयांना भेटीनंतर आढावा बैठक घेतली. बैठकीला मालेगाव महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी गैरहजर होते.

कनिष्ठ सहकाऱ्याला मंत्र्यांच्या बैठकीत माहिती द्यायला सांगून ते दुसरे काम करायला निघून गेले. हे लक्षात आल्यानंतर डॉ. पवार यांनी संताप व्यक्त करीत आधी बैठकीत त्यानंतर पत्रकार परिषदेत आयुक्तांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. मालेगाव महापालिका आयुक्तांनी मात्र सकाळी बैठकीला येऊन त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्याला अहवाल देण्याच्या सूचना देत काढता पाय घेतला.

त्यावरून वातावरण चांगलेच तापले. डॉ. भारती पवार यांनी बैठकीत आयुक्त कायमच बैठकांना गैरहजर का असतात? राज्यात दहा ते ११ जिल्ह्यांत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर पोचत असताना मालेगावला काय चाललं हे मात्र काहीच कळत नाही.

आयुक्त वारंवार बैठका टाळतात. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेले अधिकारी असे कसे वागू शकतात, असा प्रश्न करीत दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातील कामकाजातील गंभीरता आणि स्थानिक पातळीवरील बेजबाबदारपणा यातील फरक उलगडून दाखवीत झाडाझडती घेतली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Nashik News: दृष्टिबाधितांना तंत्रस्‍नेही ज्ञानदान..! KTHMचा पुढाकार, विद्यार्थी मिळवताय नावलौकिक

गंभीर व्हा, अन्यथा सीआर खराब

अधिकाऱ्यांनो गंभीर व्हा. आम्हाला केंद्र शासनाला रिझल्ट द्यावा लागतो. लोकांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या साथरोगाच्या काळात असं कसं वागू शकतात. चौकशी लावण्याचे अधिकार आम्हालाही आहेत. चौकशा लावल्या म्हणजे सीआर खराब होतील.

दिल्लीला चकरा मारायला लागू शकतात. जी जबाबदारी सोपविली आहे ती पेलता येत नाही, हे अजिबात सहन करणार नाही. साथरोगाची टांगती तलवार असताना आणि केंद्र शासनाने सूचना दिल्यानंतरही आरोग्यसारख्या गंभीर विषयावर इतके बेजबाबदारपणाने काम करीत असू तर आपल्याला लाज वाटायला हवी, इतक्या तिखट शब्दांत डॉ. पवार यांनी बैठकीत झाडाझडती घेतली.

आयुक्त थेट पत्रपरिषदेत

दोन-अडीच तासांच्या बैठकीतील तणावाच्या वातावरणातील बैठकीनंतर आरोग्य राज्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त गोसावी हजर झाले. डॉ. पवार मालेगावमधील आयुक्तांच्या कामकाजाविषयीच माहिती देत असताना, ‘मॅडम, तसं नाही. माझं ऐकून घ्या’, असे म्हणत पत्रकार परिषदेत खुलासा करू लागल्याने डॉ. पवार यांनी त्यांना थांबवीत, ‘आपण पत्रकार परिषद घेऊ शकतात.

तुमचं म्हणणं मांडू शकतात’, अशा शब्दांत सुनावले. एवढ्या सगळ्या तप्त वातावरणानंतर आयुक्तांनी स्वतंत्रपणे भेटून त्‍यांची बाजू मांडली.

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Dr. Bharati Pawar : नाशिकला कोविड पॉझिटीव्हीटी दर 5 टक्के : डॉ. भारती पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com