Dr. Bharati Pawar : औषध खरेदीत हलगर्जीपणा, चौकशीचे आदेश : डॉ.भारती पवार

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar. From left, District Council Chief Executive Officer Ashima Mittal, District Magistrate Gangatharan D.
Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar. From left, District Council Chief Executive Officer Ashima Mittal, District Magistrate Gangatharan D.esakal

Dr. Bharati Pawar : जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्‍याचे प्रकार निदर्शनात आले होते. जिल्‍हा नियोजित समितीने २ कोटींचा निधी राखीव ठेवलेला असताना औषध खरेदीत हलगर्जीपणा झाला.

या संदर्भात जिल्‍हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कारवाई केली जाणार असल्‍याची माहिती केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज (ता.१६) पत्रकार परिषदेत दिली. (Dr Bharati Pawar statement Laxity in purchase of medicine inquiry ordered nashik news)

जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दिशा समितीच्‍या आढावा बैठकीत केंद्र शासनाच्‍या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना डॉ.पवार यांनी सविस्‍तर माहिती दिली.

तत्‍पूर्वी बैठकीदरम्‍यान निधी अभावी औषध खरेदी झाली नसल्‍याचे आरोग्‍य विभागाकडून सांगण्यात आले. हा मुद्दा खोडून काढत जिल्‍हा नियोजन समितीच्‍या निधीतून खरेदी शक्‍य असल्‍याचे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले. त्‍यानंतर मंत्री डॉ.पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पत्रकार परिषदेत मंत्री डॉ. पवार म्‍हणाल्‍या, की राष्ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत राज्‍यस्‍तरावर औषध खरेदी होत असली तरी गेल्‍या काही कालावधीत ही प्रक्रिया झालेली नव्‍हती. अशात जिल्‍हा नियोजित समितीच्‍या दोन कोटी निधीतून औषधांची खरेदी होणे अपेक्षित असताना, प्रत्‍यक्षात तसे झाले नाही.

यामुळे रुग्‍णांना औषधांपासून वंचित राहावे लागले. या प्रकरणी कुणाकडून हलगर्जी झाली, यासंदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी यांना दिलेले आहेत.

बैठकीत झालेल्‍या चर्चेविषयी डॉ. पवार म्‍हणाल्‍या, की केंद्र पुरस्‍कृत विविध विभागांच्‍या ३८ योजनांचा आढावा यावेळी घेत आवश्‍यक सूचना केल्‍या आहेत. आयुष्यमान भारत जनआरोग्‍य योजनेंतर्गत जिल्ह्या‍त सुमारे सहा लाख कार्ड वाटप केले आहेत.

ग्रामीण भागात पन्नास टक्‍के वाटप झालेले असले तरी नाशिक शहरात २६ टक्‍के तर मालेगाव शहरात हे प्रमाण ३८ टक्‍के आहे. लवकरात लवकर कार्ड वाटप करत लाभार्थींना योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यता करण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar. From left, District Council Chief Executive Officer Ashima Mittal, District Magistrate Gangatharan D.
Nashik Election : जिल्हा सरकारी-परिषद कर्मचारी बँक निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर

शेतकऱ्यांशी निगडित फसल विमा योजनेसह अन्‍य योजना, घनकचरा व्‍यवस्‍थापन योजना, रेल्‍वेसंदर्भातील प्रश्‍नांसह अन्‍य विविध विभागांबाबत आढावा घेण्यात आला.

या बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांच्‍यासह अधिकारी उपस्‍थित होते.

गोदावरीचे जास्‍तीत जास्‍त पास काढा

गोदावरी एक्‍स्‍प्रेसच्‍या अनियमिततेसंदर्भात विचारणा केली असता मंत्री डॉ.पवार म्‍हणाल्‍या, की रेल्‍वे विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर नाशिक व धुळे या ठिकाणांहून गोदावरी एक्‍स्‍प्रेस सोडली जाते आहे. महसुलाचे आकलन करून रेल्‍वे विभाग साधारणतः तीन महिन्‍यांनी निर्णय घेईल.

त्‍यामुळे अधिकाधिक नाशिककरांनी पास काढत मागणी नोंदविण्याचा अजब सल्‍ला डॉ.पवार यांनी यावेळी दिला.

दरम्‍यान रेल्‍वे विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही. लोकप्रतिनिधींनी दिलेले पत्र मंत्रालयात पाठविण्याऐवजी स्‍थानिक स्‍तरावर त्‍यासंदर्भात सोडवणूक होण्याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar. From left, District Council Chief Executive Officer Ashima Mittal, District Magistrate Gangatharan D.
Officers Transfer : कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारीही यंदा बदलीस पात्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com