Dr Bharti Pawar : अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार

Minister Health MP Dr. Bharti Pawar
Minister Health MP Dr. Bharti Pawaresakal

Dr Bharti Pawar : केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत.

या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील चार रेल्वेस्थानकांच्या आधुनिकरणासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास होऊन रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Dr Bharti Pawar Railway stations in district will shine under Amrit Bharat Sthanak Yojana nashik news)

डॉ. पवार यांनी सांगितले, की, यात प्रामुख्याने मनमाड रेल्वेस्थानक आधुनिकीकरण ४४.८० कोटी, नगरसूल रेल्वेस्थानक आधुनिकीकरण २०.०३ कोटी, लासलगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण १०.१० कोटी, नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण १०.१४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनमाड, चाळीसगाव, शेगाव, बडनेरा, मलकापूर, नेपानगर या सहा रेल्वेस्थानकांवर रविवारी (ता. ६) सकाळी नऊला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मनमाड येथे डॉ. पवार व नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे देखील उपस्थित राहणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष यांची उपस्थिती असेल. या योजनेंतर्गत विविध अद्ययावत सोयीसुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Minister Health MP Dr. Bharti Pawar
Nashik News : तरुणाईच्या मदतीने चोरट्यांवर राहणार वॉच! एक रात्र गावासाठी अभियान...

स्थानक प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसविण्यात येणार आहे. विकासकामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह, नवीन फूटओवर बीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.

जिल्ह्यातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होण्यासाठी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याने डॉ. पवार यांनी पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.

Minister Health MP Dr. Bharti Pawar
Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com