नाशिक- शहरासह जिल्हाभरात अवयवदान चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले डॉ. भाऊसाहेब मोरे (वय ७२) यांचे मंगळवारी (ता. ८) दुपारी निधन झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे मरणोत्तर देहदान करण्यात आले. पंचवटीतील मखमलाबाद नाका येथील विठाई हॉस्पिटल, तसेच गंगापूर रोडवरील ॠषीकेश हॉस्पिटलचे संचालक म्हणून डॉ. मोरे यांनी वैद्यकीय सेवेत योगदान दिले.