शिक्षणाच्या दीपस्तंभाची वाटचाल : डॉ. दीप्ती देशपांडे

शिक्षणाच्या दीपस्तंभाची वाटचाल : डॉ. दीप्ती देशपांडे
Published on: 
फोटो - NSK26H31502 शिक्षणाच्या दीपस्तंभाची वाटचाल : डॉ. दीप्ती देशपांडे -------------------------------------------- शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची आणि समाजाच्या प्रगतीला दिशा देण्याची प्रभावी शक्ती आहे. या पवित्र कार्याला आपले जीवन समर्पित करून शिक्षणसंस्थेच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांचे नाव आदराने घेतले जाते. बुधवारी (ता.७) त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त... - डॉ. लीना मिलिंद भट, प्राचार्य, बी. वाय. के. कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटी ही शिक्षणाच्या क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणारी अग्रगण्य संस्था आहे. संस्थेच्या व्यापक आणि समृद्ध शैक्षणिक परंपरेला आधुनिक काळाची गरज, बदलते तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा यांची सांगड घालण्याचे महत्त्वपूर्ण काम त्‍यांच्‍या नेतृत्वाच्या माध्यमातून घडत असते. सचिव म्हणून डॉ. दीप्ती देशपांडे यांची भूमिका या दृष्टीने मोलाची आहे. शैक्षणिक संस्थेचे नेतृत्व करताना केवळ प्रशासकीय कौशल्य पुरेसे नसते; त्यासाठी शिक्षणक्षेत्राची जाण, संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आवश्यक असते. डॉ. देशपांडे यांच्या कार्यशैलीत या गुणांचा सुरेख समन्वय जाणवतो. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि समाज या सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. शिक्षणसंस्था ही केवळ परीक्षा आणि पदवी देणारी व्यवस्था न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असावे, हा विचार त्या प्रत्यक्ष कृतीत आणत आहेत. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत योग्य ते बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करण्याचे काम त्या करत आहेत. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा शिल्पकार असल्याने शिक्षकांना पोषक वातावरण, प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. सहकाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करत त्यांनी संस्थेत उत्तम संघभावना रुजवली आहे. संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित शिक्षण जपत एका बाजूला संस्थेची परंपरा आणि दुसऱ्या बाजूला डिजिटल युग, कृत्रिम बुद्धिमत्ता व जागतिक स्पर्धा यांचा उत्तम समतोल त्यांनी साधला आहे. प्रशासकीय शिस्तीसोबत मानवी संवेदनशीलतेतून सहकाऱ्यांशी संवाद साधत सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने ज्ञान, गुणवत्ता व सामाजिक बांधिलकीची परंपरा अधिक समृद्ध करावी, हीच सदिच्छा.(जाहिरात पुरस्कृत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com