नाशिक- मुख्यमंत्री १०० दिवस सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यात द्वितीय, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी तृतीय तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तृतीय पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारला. मुंबईतील मंत्रिमंडळ सभागृहात बुधवारी (ता.७) हा सोहळा पार पडला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अपर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.