प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांचा सेवापूर्तीनिमित्त नाशिकला सत्कार

प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांचा सेवापूर्तीनिमित्त नाशिकला सत्कार
Published on: 
फोटो -NSK26H34433 नाशिक : प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. हरीश आडके, प्राचार्य रावसाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ व प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे. प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांचा सेवापूर्तीनिमित्त नाशिकला सत्कार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य तथा देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या सेवानिवृत्ती, प्रदीर्घ शैक्षणिक सेवा आणि उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथे प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, प्राचार्य डॉ. हरीश आडके, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे यांनी डॉ. हितेंद्र आहेर यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदानाचा गौरव केला. प्राचार्य डॉ. हरीश आडके यांनी त्यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी डॉ. हितेंद्र आहेर यांच्या मनमिळाऊ स्वभावाचा, सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपण्याच्या वृत्तीचा आणि सुख-दुःखाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहण्याच्या सामाजिक बांधिलकीचा उल्लेख केला. प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी समारोपाच्या भाषणात डॉ. आहेर यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत त्यांच्या शैक्षणिक व संस्थात्मक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.