येवल्याचे डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांना उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार जाहीर इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सन्मान,नागपूर येथे १४ ला वितरण

येवल्याचे डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांना उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार जाहीर इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सन्मान,नागपूर येथे १४ ला वितरण
Published on: 
पान-३ YEO26B27283 --------------------- ३०-२ येवल्याचे डॉ. क्षत्रिय यांना उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार जाहीर ‘आयएमए’कडून नागपूर येथे १४ ला वितरण सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२२ : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेतर्फे येथील शाखाध्यक्ष व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांची प्रेसिडेंट्स ॲप्रिसिएशन अवॉर्ड- बेस्ट प्रेसिडेंट या राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, वैद्यकीय सामाजिक कार्य आणि आयएमएच्या संघटनात्मक कार्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘आयएमए’चे राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी निवड घोषित केली आहे. या पुरस्काराचे वितरण १४ नोव्हेंबरला सायंकाळी पाचला नागपूर येथे आयोजित आयएमए राज्य पुरस्कार सोहळ्यात होणार आहे. हा सोहळा मास्टॅकॉन या परिषदेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आला आहे. डॉ. क्षत्रिय यांनी येवल्यासारख्या ग्रामीण भागात आधुनिक स्त्रीरोग उपचार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि वंध्यत्व निवारण उपचार उपलब्ध करून देत वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पत्नी भूलतज्ज्ञ डॉ. दीपाली क्षत्रिय यांच्या सहकार्याने त्यांनी अनेक महिलांची प्रसूती सुखरुप केली आहे. मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. -------------- कोट आयएमए महाराष्ट्र राज्य शाखेचा हा पुरस्कार माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे, या भावनेतून आजवर रुग्णसेवा आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल घेण्यात आली याचा मनस्वी आनंद आहे. - डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, स्त्रीरोग तज्ज्ञ, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com