Nashik: डॉ. मंगरूळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी; नाशिक विभागात उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या

Nitin Sadgir
Nitin Sadgiresakal

Nashik News : नाशिक विभागातच संगमनेर येथे उपविभागीय अधिकारीम्हणून कार्यरत उपजिल्हा डॉ. शशिकांत मंगरूळे यांची नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारीम्हणून नियुक्ती झाली आहे.

नाशिक विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या बदलीचे काल (ता.१२) आदेश काढण्यात आले आहेत. महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी हे बदली आदेश काढले आहेत. (Dr Mangarule Upazila Election Officer Transfers of Deputy Collectors and Tehsildars in Nashik Division)

नंदुरबार येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावर कार्यरत असलेले नितीन सदगीर यांची मालेगावच्या प्रांताधिकारीपदी बदली झाली आहे. महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांमध्ये श्री. सदगीर यांच्या बदलीचा समावेश आहे.

येथील प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची बदली प्रस्तावित असताना श्री. सदगीर यांची नियुक्ती झाली आहे. श्री. शर्मा यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. मालेगाव उपविभागाचे नूतन प्रांताधिकारी म्हणून श्री. सदगीर कामकाज पाहतील.

१५ जूनपूर्वी रुजू होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. श्री. सद्‌गीर यांच्यासह कुंदनकुमार सोनवणे यांची सहाय्यक आयुक्त नाशिक नियुक्ती झाली आहे. नाशिकलाच ते भुसुधार सहाय्यक आयुक्त म्हणून कामकाज पाहत होते.

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांची उपजिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक येथे बदली झाली आहे. तर या पदावर पूर्वी कार्यरत असलेल्या स्वाती थविल यांची उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्रमांक १ नाशिक तर संजय बागडे यांची सचिव नंदुरबार या पदावर बदली झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nitin Sadgir
Nashik News: नशीब बलवत्तर, देवदुतांच्या मेहनतीने मृत्यूवर मात! तरुणाला वाचविण्यात डॉक्टर यशस्वी

यापूर्वी श्री. बागडे नंदुरबार येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होते. याशिवाय राज्यातील नितीन गावंडे, विठ्ठल सोनवणे, अर्चना जाधव-तांबे, संदीप चव्हाण व डॉ. विक्रम बांदल या उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

तहसीलदारांमध्ये मंदार कुलकर्णी (नवापूर- चांदवड), श्वेता संचेती (मुक्ताईनगर- त्र्यंबकेश्वर), महेश पवार (नवापूर), संदीप भोसले (कोपरगाव), रोहिदास वारुळे (अहमदनगर- कळवण), गायत्री सौंदाणे (धुळे ग्रामीण- पारनेर जि. अहमदनगर), अरुण शेवाळे (जामनेर- धुळे ग्रामीण), दत्तात्रय शेजूळ (मालेगाव- अपर तहसीलदार, पिंपळनेर), दीपक धिवरे (भुसावळ- मालेगाव), कैलास चावडे (बागलाण), अभिजित बारवकर (इगतपुरी) व सुरेंद्र देशमुख (सिन्नर) यांचा समावेश आहे.

Nitin Sadgir
Nashik News: सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यावरील स्थगिती उठली; आमदार दिलीप बोरसे यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com