YCMOU Vice-Chancellor: 'मुक्‍त'च्‍या कुलगुरुपदी डॉ. संजीव सोनवणे; राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍याकडून आदेश जारी

Dr. Sanjeev Sonavane
Dr. Sanjeev Sonavaneesakal

YCMOU Vice-Chancellor : राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदासाठी डॉ.संजीव सोनवणे यांच्‍या नावाची घोषणा झाली आहे. सध्या त्‍यांच्‍याकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु पदाची जबाबदारी आहे.

यादरम्‍यान शुक्रवारी (ता.१९) राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी मुक्‍त विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदी डॉ.सोनवणे यांच्‍या नियुक्‍तीचे आदेश जारी केले आहेत. (Dr Sanjeev Sonawane selected vice chancellor YCMOU Order issued by Governor Ramesh Bais nashik news)

शिक्षणाची 'ज्ञानगंगा घरोघरी' या ब्रीदवाक्‍यानुसार दूरस्‍थ व मुक्‍त शिक्षणातून वंचित, उपेक्षितांना शिक्षणाच्‍या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाकडून केले जाते आहे.

प्रा.डॉ.ई. वायुनंदन यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्‍यानंतर विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदाचा प्रभारी पदभार राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्‍याकडे सोपविण्यात आला होता.

कुलगुरु निवड प्रक्रियेतील बदलासाठी तत्‍कालीन महाविकास आघाडीचे प्रयत्‍न सुरु असल्‍याने निवड प्रक्रिया ठप्प झालेली होती. दरम्‍यानच्‍या कालावधीत देशभरातील विद्यापीठांत कुलगुरु निवड प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्‍यायालयाचा निकालानंतर मुक्‍त विद्यापीठाच्‍या निवड समितीकडून पुन्‍हा प्रक्रिया हाती घेतली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr. Sanjeev Sonavane
Trimbakeshwar Temple: 'नाशिकमधील 'ती' मशीद नसून नाथ सांप्रदायातील मंदिर', अनिकेत शास्त्रींच्या दाव्याने खळबळ

इच्‍छुक उमेदवारांच्‍या मुलाखती घेतांना निवड समितीकडून मे महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात कुलगुरुपदाकरिता पाच उमेदवारांची संभाव्‍य यादी राज्‍यपाल कार्यालयाकडे सादर केली होती. व यानंतर कुलपती तथा राज्‍यपाल रमेश बैस यांनी संभाव्‍य उमेदवारांच्‍या मुलाखत मुंबई येथे घेतली होती.

यानंतर कुलगुरुंच्‍या नावाच्‍या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा सर्वांना लागून होती. अखेर शुक्रवारी राजभवनातून राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ.संजीव कुमार यांच्‍या नियुक्‍तीचे आदेश जारी केले.

Dr. Sanjeev Sonavane
MSRTC Nathjal: STच्या 'नाथजल'ची वाढीव दराने विक्री; नाशिक रोड बस स्थानकावरील पाणी विक्री स्टॉलचा परवाना रद्द

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com