Satyajeet Tambe : सत्यजित सर्वार्थाने योग्य उमेदवार; डॉ. सुधीर तांबे यांनी भूमिका केली स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. sudhir tambe and satyajeet tambe

Satyajeet Tambe : सत्यजित सर्वार्थाने योग्य उमेदवार; डॉ. सुधीर तांबे यांनी भूमिका केली स्पष्ट

नाशिक : एक पदवीधर म्हणून आपले विविध प्रश्न सोडविण्यासाठी व मतदारांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी सत्यजित सर्वार्थाने योग्य उमेदवार आहेत. माझा वारसा नाही तर कामाचा वसा पुढे नेण्यासाठी सत्यजित यांना निवडून आणा, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. (Dr Sudhir Tambe statement about Satyajeet Tambe perfect candidature nashik news)

नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारार्थ डॉ. तांबे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मागील चौदा वर्ष मतदारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे बळ मिळाले. सत्यजित तांबे यांना केवळ माझा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी पुढे आणलेले नाही.

ते सर्वार्थाने योग्य उमेदवार आहेत म्हणून निवडून द्या. शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसह इतर प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. मतदारसंघातील शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, खासगी नोकरदार, शेतकरी आणि विविध प्रोफेशनल्स अशा विविध क्षेत्रातील पदवीधरांसाठी २४ तास उपलब्ध होतो. पाच जिल्ह्यांतील ‘जामनेर ते पारनेर’ इतक्या मोठ्या मतदारसंघात काम करताना अनेक आव्हाने समोर होती.

या आव्हानांचा मुकाबला करत विविध प्रश्न सोडविले. चौदा वर्षे काम करताना मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, स्नेह दिला यामुळेच मला काम करण्याचे बळ मिळाले. या स्नेहाबद्दल कृतज्ञ आहे. मी भावनिकदृष्ट्या मतदारांशी जोडलेला आहे, अशा शब्दांत डॉ. सुधीर तांबे यांनी भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सत्यजित तांबे माझा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी पुढे आणलेले उमेदवार नाहीत. सर्वार्थाने ते सुयोग्य उमेदवार आहेत म्हणून निवडून द्या, असे आवाहन डॉ. तांबे यांनी केले. सत्यजित यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कारकीर्द २२ वर्षांची आहे.

या काळात त्यांनी संघटनात्मक पातळीवर खूप मोठे काम केल्याचे डॉ. तांबे यांनी आवर्जून सांगितले. सत्यजित यांनी राज्यशास्त्र, व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेतली आहे. तंत्रज्ञानाशी स्नेही आहेत. विविध भाषेतील पुस्तकांचे वाचन, तरुणाईसाठी प्रेरक वक्ता ही देखील त्यांची एक ओळख आहे.

जगभरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींपासून आपल्या ग्रामीण भागातील जनजीवनाचा सत्यजित तांबे यांना सखोल अभ्यास आहे. त्यामुळेच एक पदवीधर म्हणून आपले विविध प्रश्न सोडविण्यासाठी, आपल्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी ते सर्वार्थाने सुयोग्य उमेदवार असल्याचे डॉ. तांबे म्हणाले.

"सत्यजित तांबे यांना राजकीय वारसा चालविण्यासाठी पुढे आणलेले नाहीत. ते सर्वार्थाने योग्य उमेदवार आहेत. उच्चशिक्षित, संघटनेचा अनुभव व विषय मार्गी लावण्याची त्यांची हातोटी आहे."

- डॉ. सुधीर तांबे, आमदार, नाशिक पदवीधर मतदारसंघ.

टॅग्स :NashikSatyajeet Tambe