पान तीन
-------------
डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरण (लोगो करणे)
डॉ. स्वाती चव्हाण यांच्या
जामीनावर आज सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले डॉ. स्वाती नकूल वंजारी ऊर्फ डॉ. स्वाती शंकर चव्हाण यांच्या जामीनावर सोमवारी (ता. ५) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. डॉ. चव्हाण यांना गेल्या २० सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. तर याच प्रकरणात मृत डॉ. मनिषा जेजुरकर यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांना अटक करण्यात आलेली असून ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
डॉ. मनिषा जेजुरकर यांनी गेल्या ६ मार्च २०२६ रोजी सकाळी गंगापूर रोड परिसरातील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. रोहिणी वैभव थोरात यांच्या फिर्यादीनुसार, मयत डॉ. जेजुरकर यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांनाही याप्रकरणात सहआरोपी करण्यात आलेले आहे.
डॉ. नीलेश जेजुरकर व डॉ. स्वाती चव्हाण यांच्यात मैत्रीपलीकडचे संबंध असण्याला पुष्टी मिळाली, तसेच डॉ. चव्हाण यांचा जेजुरकर कुटुंबात हस्तक्षेप असल्याचे तपासातून समोर आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी गेल्या १८ सप्टेंबरला डॉ. नीलेश जेजुरकर यांना तर २० सप्टेंबरला रात्री डॉ. स्वाती जेजुरकर यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, डॉ. स्वाती चव्हाण यांनी जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सरकार पक्षाने जामिनाला विरोध केला आहे तर, बचाव पक्षाने पोलिस तपास पूर्ण झाला असून चौकशीत सहकार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे जामीन मिळावा अशी मागणी केली आहे.