नाशिक : प्रारूप मतदार यादी 17 जूनला

NMC Nashik
NMC Nashikesakal

नाशिक : काही दिवसांपूर्वीच महिला आरक्षणाची सोडत (Women Reservation Draw) झाल्‍याने महापालिका निवडणुकीचे (NMC Elections) पडघम वाजू लागले आहेत. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीच्‍या मोर्चेबांधणीला इच्‍छुकांकडून सुरवात झालेली आहे. अशात येत्‍या १७ जूनला महापालिका प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाची तयारी सुरू आहे. सुमारे एक हजार मतदार याद्यांत दहा ते अकरा लाख मतदारांच्‍या नावाचा समावेश असल्‍याची शक्‍यता आहे. (Draft voter list on 17th June NMC Election Nashik News)

महापालिका प्रशासनातर्फे मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्‍या अनुषंगाने तयारीची लगबग सुरू आहे. यंदाच्‍या निवडणुकीतून महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार असून, १२२ ऐवजी १३३ नगरसेवक नाशिककर मतदार निवडणार आहेत. या वाढीव अकरा जागांसह सर्वच जागांकरिता इच्‍छुकांची तयारी सध्या सुरू आहे. १ फेब्रुवारीला महापालिकेने प्रारूप प्रभागरचना जाहीर केलेली असताना, त्‍यानंतर हरकती मागविल्‍या होत्‍या.

NMC Nashik
भद्रकाली पोलिसांकडून 2 हजाराचा मद्यसाठा जप्त

हरकतींवर सुनावणी होण्यापूर्वीच ओबीसी आरक्षणाच्‍या पार्श्वभूमीवर ओबीसी घटकांना आरक्षण देण्याकरिता पूर्वीची प्रभागरचना रद्द केल्‍याचे शासनातर्फे सांगण्यात आले होते. अशात निवडणूक आयोगामार्फत होणारी प्रक्रिया मंदावली होती. राज्य शासनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवताना राज्य निवडणूक आयोगाला लवकरात लवकर निवडून प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. नंतरच्‍या कालावधीत आयोगाने प्रक्रिया राबविताना गेल्‍या १७ मेस अंतिम प्रभागरचना जाहीर केली होती. यानंतर निवडणूक कार्यक्रमाला गती प्राप्त झाली होती. पुढील टप्यांत महिला आरक्षण सोडत जाहीर झाल्‍या.

NMC Nashik
अबब! कोंबड्याच्या खुराड्यात चक्क कोब्रा घुसला अन्...

यामध्ये १३३ पैकी तब्बल ६७ जागांवर महिलांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे. प्रक्रियेतील पुढील टप्यांत येत्‍या १७ जूनला निवडणूक आयोगाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्‍याचे म्‍हटले आहे. यासंदर्भातील तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरु आहे. प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्‍यानंतर आवश्‍यक ती प्रक्रिया राबविल्‍यानंतर ७ जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com