बातमी व फोटो दोन कॉलमात घ्यावा
NSK26H31611
जळगाव : डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एकपात्री व नाट्यछटा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व शिक्षक.
....
डॉ. आचार्य विद्यालयात
नाट्यछटा, एकपात्री स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : विवेकानंद प्रतिष्ठान संचालित डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी एकपात्री व नाट्यछटा स्पर्धा उत्साहात झाली. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, आत्मविश्वास वाढावा आणि अभिनय कलेची ओळख व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध ऐतिहासिक, सामाजिक आणि समकालीन विषयांवरील व्यक्तिरेखा सादर केल्या. जिजामाता, मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, सईबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई, सोयराबाई, तानाजी यांसह आई, शिक्षक, शेतकरी, झाड, पुस्तक, मोबाईल, चायवाला आदी भूमिका विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे साकारल्या. मुख्याध्यापिका डॉ. रत्नमाला पाटील व समन्वयक छोटू पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण केतन वाघ व संध्या पायघन यांनी केले. सूत्रसंचालन चिरायू सोमाणी व आर्या पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रमोद इसे व अर्चना मोराणकर यांनी सहकार्य केले.