Drinking Water Crisis : 24 तासाचे सोडा, सिन्नरला 4 दिवसाआडही पाणी नाही

Water Tap
Water TapSakal

सिन्नर : शहरवासीयांना निवडणूक काळात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु चोवीस तास सोडा चार दिवस उलटूनही शहरातील उपनगरात पाणीपुरवठा होत नाही.

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून विस्कळित असलेला पाणीपुरवठा दैनंदिन करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे.

Water Tap
Drinking Water : पाणी कमी पिता? ट्राय करा 'या' ट्रिक्स

सिन्नरमध्ये काही दिवसांपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. नंतर त्याचा कालावधी हा वाढत जाऊन तो आता चार दिवसाआड झाला आहे. त्यामुळे करदाते नागरिक नागरिक हैराण झाले आहे. नगरपालिकेकडून ३६५ दिवसांची पाणीपट्टी घेतली जात

असली तरी वर्षभरात प्रत्यक्षात १३० ते १४० दिवसच पाणीपुरवठा होत आहे. त्यात वारंवार जलवाहिनी फुटणे, त्यात आणखी पाच सहा दिवस जातात. नागरिकांना पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यानंतरही होणारा पाणीपुरवठा हा अत्यल्प असल्याने नागरिकांना अधूनमधून पाण्याचे टॅंकर विकत घ्यावे लागते.

Water Tap
Water Crisis : शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट; El Nino वादळामुळे हाय ॲलर्ट!

नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट येऊन सव्वा वर्षाचा कालावधी लोटला आहे. प्रशासक नियुक्त होऊनही पाणीपुरवठ्यातील अनियमितता हा मागील पानावरून पुढे चालू असाच आहे असा आरोप श्री. कोतवाल यांनी करून तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरतील.

तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी श्री.कोतवाल यांनी केली आहे. मागणीचे निवेदन मुख्याधिकारींना देण्यात आले आहे.

Water Tap
Nashik News : ‘ऑक्सिजन' हवाय ‘कार्बन' नको; पांजरपोळवरून मनसेची भूमिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com