esakal | पाणी वाटपाच्या ढिसाळ नियोजनाने इगतपुरी शहर तहानलेलच
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply

पाणी वाटपाच्या ढिसाळ नियोजनाने इगतपुरी शहर तहानलेलच

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : पावसाचे माहेरघर असलेल्या शहरात नगर परिषदेचे पाणी वाटप नियोजन नसल्याने शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जात नाही. शहरात चार दिवसाआड आठवड्यातुन दोनदा पाणी पुरवठा केला जात असल्याची नागरीकांची ओरड असुन, अनेकदा निवेदने देवूनही परिस्थीती जैसे थेच आहे. शहरात पाणी पुरवठा सुरळीत सुरू ठेवला तर विशेष प्रभागाला पाणी पुरवठा केला जातो अशी खंत नगरसेविका तथा गटनेता साबेरा पवार यांनी मुख्याधिकारी पंकज गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली. (drinking-water-shortage-in-igatpuri-nashik-marathi-news)

पाणी पुरवठा सुरळीत कधी होईल?

अनेक वर्षांपासून शहरात पाण्याची समस्या केवळ नियोजनाअभावी भेडसावत आहे. मागील दोन वर्षांपूर्वी नगर पालिका तलावाची पाणी पातळी वाढविण्याच्या कामासह शासनाचे दिड ते दोन कोटी रूपये निधी वापरून तलावातून वाहणाऱ्या पाण्याची सांडही दुरूस्त केली. भावली धरणाचा शहराला पाणी पुरवठा चोविस तास व्हावा या कामी शहरात पाईप लाईन पण टाकली. मात्र शहराला पाणी पुरवठा सुरळीत कधी होईल? या प्रतिक्षेत गेली तिन वर्षे लोटली; पण अद्याप पाणी आलेच नाही.

हेही वाचा: ६४ वर्षांची परंपरा मोडीत; येवल्यात शेतकरीहिताचा ऐतिहासिक निर्णय

पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा तिव्र आंदोलन

पावसाळा सुरू होताच शहरात सुमारे ६५२ मि.मी. पाण्याची पातळी वाढली हे पाणी शहराला किमान तीन महिने पुरेल असे असतांना पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी जनतेला उडवा उडवीची कारणे सांगून पाणी टाकीत भरत नाही.
पाण्याकरीता वणवण करायची का? असे असेल तर जनतेचा उद्रेक वाढेल म्हणुन मुख्याधिकाऱ्यांना शहर पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा पाणी नियोजना बाबत तिव्र स्वरूपाचे जन आंदोलन केले जाईल. असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला असल्याचे साबेरा पवार यांनी वेळी सांगीतले.

(drinking-water-shortage-in-igatpuri-nashik-marathi-news)

हेही वाचा: येवल्यात कोरोना रुग्णसंख्या थांबता थांबेना!

loading image