नाशिक : भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतर सर्वत्र सावधगिरी बाळगण्याच्या सूचना संरक्षण व गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शहरात ड्रोन उडविण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दुजोरा दिला आहे..पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानातील नागरी वस्त्यांवर हल्ला न करता टिपून अतिरेकी ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारताच्या सीमेवरील व अंतर्गत हवाई क्षेत्रावर सुरक्षिततेसाठी नजर ठेवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमधील हवाई क्षेत्रात ड्रोन उडविण्यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. .ड्रोन उडविण्यापूर्वी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. विशेष करून रेड झोनमध्ये ड्रोन उडविता येणार नाही. नाशिक शहरात सीएनपी, आयएसपी, रेल्वे इंजिन कारखाने, एचएएल, आर्टिलरी सेंटर, एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन, सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स, मध्ये रेल्वेवरील प्रमुख नाशिक रोड रेल्वेस्थानक तसेच रामतीर्थ, मुक्तिधाम, श्री काळाराम मंदिर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही महत्त्वाची देवस्थानाची ठिकाणे आहेत..निर्णयात महत्त्वाचेजीव किंवा इमारतींना धोका निर्माण होत असेल, अनधिकृत प्रवेश, सूचनांचे पालन न केल्यास गुन्हा दाखल२५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनची डिजिटल स्कॉय प्लॅटफॉर्मवर नोंदणी बंधनकारकपरवानगी शिवाय ड्रोन उडविण्यास बंदी, उडविण्यासाठी ग्रीन, यलो, रेड झोन, येलो झोनमध्ये परवानगी, तर रेड झोनमध्ये पूर्णपणे बंदीपरवानगी घेतलेले ड्रोन १२० मीटरपर्यंत उडविता येतात, सरकारी उद्देश वगळता रात्री ड्रोन उडविण्यास बंदीपरवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रण, निरीक्षण दंडनीय अपराध, अनधिकृत उड्डाणावर दंड.पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टमवर भारताचा स्ट्राईक, थेट लाहोर टार्गेटवर; आज सकाळी पुन्हा दिलं चोख प्रत्युत्तर.सार्वजनिक ठिकाणी ड्रोन उडविण्यास सक्त मनाई आहे. पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये यासाठी विशेष शाखेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, नाशिक शहर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.