तीन तालुक्यातील पंचनाम्यांना गती

तीन तालुक्यातील पंचनाम्यांना गती
Published on: 
तीन तालुक्यांतील पंचनाम्यांना गती --- दुष्काळी परिस्थिती : महसूल, कृषी यंत्रणा बांधावर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : दुष्काळाच्या यादीत नव्याने समावेश झालेल्या त्र्यंबकेश्‍वर, निफाड व चांदवड तालुक्यांतील नुकसानीच्या पंचनाम्यांना गती देण्यात आली. पंचनाम्यांसाठी महसूल व कृषी अधिकारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन माहिती गोळा करीत आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत हे काम पूर्ण होईल. उर्वरित दहा तालुक्यांतील पंचनाम्यांची कामे संपली असून, तेराही तालुक्यांची माहिती एकत्रित पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चालू वर्षी पावसाने खंड दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णत: करपल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले. राज्य सरकारने जिल्ह्यातील दहा तालुक्यांत प्रथमत: दुष्काळ घोषित करताना विविध १२ प्रकारच्या उपाययोजना लागू केल्या होत्या. त्यानंतर महसूल व कृषी विभागाने संबंधित तालुक्यांतील नुकसानीचे जवळपास पंचनामे पूर्ण केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या दबावानंतर सरकारने निफाड, चांदवड तसेच त्र्यंबकेश्‍वर या तीन तालुक्यांचा नव्याने दुष्काळी यादीत समावेश करताना तेथेही पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या आदेशानुसार दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नव्याने समावेश झालेल्या निफाड, चांदवड, तसेच त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात आता पंचनाम्यांची कामे हाती घेण्यात आली. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महसूल व कृषीसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी बांधावर उतरले. पुढील दोन ते तीन दिवसांत हे पंचनामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने यंत्रणा काम करीत आहेत. शेतकऱ्यांना मदतीची आस चालू आठवड्यातच जिल्ह्याचा एकत्रित अहवाल सरकारला सादर करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. एकूणच, यंत्रणांनी पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले. एकूणच, यंत्रणांची गती पाहता दिवाळीपूर्वी सरकारकडून मदतीची घोषणा केली जाईल, अशी आस बळीराजाला लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com