

Online Satbara
सटाणा - निसर्गाने पिके हिरावली, दुष्काळाने उत्पन्नाची आशा संपवली आणि आता शासनाच्या ठप्प ऑनलाइन यंत्रणेने मदतीचा मार्गही रोखला. बागलाणमध्ये दुष्काळ जाहीर होऊनही सातबारा व ‘फार्मर आयडी’साठीची संकेतस्थळे बंद असल्याने शेतकऱ्यांना मदतीऐवजी महा-ई-सेवा केंद्रांचे हेलपाटे मारावे लागत आहेत. दिवसभर रांगेत उभे राहूनही ‘वेबसाईट बंद आहे, उद्या या’ एवढेच उत्तर मिळत असल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर प्रशासकीय यंत्रणेनेच मीठ चोळल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.