कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पाहणी

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पाहणी
Published on: 
(पान ३ ला मेन) फोटो क्रमांक ः 31896 मुकटी : दुष्काळामुळे पीकाची पाहणी करताना हर्षवर्धन सपकाळ, युवराज करनकाळ. शेजारी शेतकरी, काँग्रेसचे पदाधिकारी. -- राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला! - हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल; जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १० : जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, हातातोंडाशी आलेली पिके वाळू लागल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. या जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता अत्यंत गंभीर असताना सरकारकडून मात्र ठोस मदतीऐवजी केवळ पोकळ आश्वासनांची खैरात केली जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला,’ अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारच्या फसव्या दुष्काळ निवारण उपाययोजनांचा समाचार घेतला. - मुकटी (ता. धुळे) शिवारात श्री. सपकाळ यांनी थेट शेताच्या बांधावर जात वाळलेल्या पिकांची पाहणी केली. या वेळी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी पिकांचे झालेले नुकसान आणि वाढता कर्जाचा डोंगर याविषयीची भीषण वास्तवता जाणून घेतली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष रितेश पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती गुलाब कोतेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य छोटू चौधरी, डॉ. दिनेश बच्छाव, शाबीर शेख, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, भा. ई. नगराळे, मुझफ्फर हुसेन, राजेंद्र खैरनार, पितांबर महाले, जसपालसिंग सिसोदे, सुधीर जाधव, प्रमोद सिसोदे, रवींद्र चौधरी, डॉ. हर्षल भामरे, राहुल खोंडे, डॉ. दरबारसिंग गिरासे, किशोर वाकडे, जाविद शाह, तसेच कृषी अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी यांच्यासह मुकटी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. - आर्थिक मदतीचा प्रश्‍न श्री. सपकाळ म्हणाले, की धुळे जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती भयावह आहे. कपाशी, बाजरी यांसारखी मुख्य पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेली आहेत. अशा बिकट प्रसंगी शेतकऱ्यांना केवळ घोषणांवर अवलंबून ठेवणे हा त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. सरकारने तात्काळ कागदी घोडे नाचवणे बंद करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी एक लाख रुपयांची ठोस आर्थिक मदत थेट जमा करावी, अशी मागणी आहे. - एसी केबीन सोडावी श्री. सपकाळ यांच्या या मुकटी दौऱ्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता आणि शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एसी केबिन सोडून शेताच्या बांधावर यावे, तरच जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता समजेल, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com