टुडे पान १ : फ्लायर
-------
(संग्रहित छायाचित्र वापरावे)
शीर्षक
जिल्ह्यात पिके करपली; पंचनामे रखडले
दुष्काळ जाहीर होऊनही १२ टक्केच प्राथमिक पंचनामे; ‘ॲप’ला रेंजचा अडसर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असला, तरी अद्याप पंचनाम्यांना अपेक्षित गती मिळालेली नाही. आतापर्यंत केवळ १२ टक्के प्राथमिक पंचनामे झाले असून, अनेक ठिकाणी ‘ॲप’ला रेंज नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे पंचनाम्याऐवजी सरसकट एकरी मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जळगाव दौऱ्यात याबाबत निर्णयाची अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत पावसाअभावी खरीप पिके करपली आहेत. उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आदी पिके जागेवरच पिवळी पडली असून, उत्पादन हातात आलेले नाही. जूनअखेरीस पावसाला सुरुवात झाली. जुलैमध्ये दोन-तीन दिवस पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. गणेशोत्सवाच्या दोन दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला; मात्र त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड कायम आहे. दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरडवाहू कापसाला बोंडे लागली, मात्र पावसाअभावी ती फुटली नाहीत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघालेला नाही. उडीद, मूग, सोयाबीनची पिके हातची गेली असून खरीप हंगाम वाया गेला आहे. आता रब्बीचा हंगाम तरी साधतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
--------------
कर्जांचा डोंगर, चिंता
खरिपाच्या भरवशावर बँका, सावकार व पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, मुलांचे शिक्षण, विवाहाचा खर्च आदी प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. अशातच पीकपेरा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कर्मचारी पीकपेरा नोंदवत आहेत. मात्र पिके जळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरवून शेत पुढील हंगामासाठी तयार केले आहे. अशा शेतांचे पंचनामे कसे होणार, असा प्रश्न आहे.
-------
चौकट..
महसूलमंत्री आज शेतकऱ्यांना भेटणार
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी रात्री जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. अजिंठा शासकीय विश्रामगृहात मुक्काम केल्यानंतर रविवारी (ता. ४) सकाळी ९.५० ला ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी दहाला नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी सव्वाबाराला पातरखेडे (ता. एरंडोल) येथे दुष्काळग्रस्त भागाची पीकपाहणी करतील. त्यानंतर ते धुळे जिल्ह्याकडे रवाना होतील. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा, राजशिष्टाचार व वाहन व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.
-----
(ग्राफिक्स)
आकडे बोलतात...
खरिपातील लागवड : ८ लाख ३२ हजार १३७ हेक्टर
एकूण शेतकरी : ६ लाख ५७ हजार ९६९
झालेले पंचनामे : १ लाख ३५३.३९ हेक्टर
पंचनामे झालेले शेतकरी : १ लाख ३ हजार १८४
-------