इगतपुरीत पाणीटंचाईआधीच उपाययोजनांना गती द्या

इगतपुरीत पाणीटंचाईआधीच उपाययोजनांना गती द्या
Published on: 
चित्र दुष्काळाचे/इगतपुरी फोटो - IG226B05866 घोडेवाडी : परिसरात पावसाअभावी करपलेले भाताचे पीक. इगतपुरीत पाणीटंचाईआधीच उपाययोजनांना गती द्या ----------------------------------------- स्थलांतर रोखण्यासाठी रोजगारासह, सुरळीत वीज, कर्जमाफीची मागणी पोपट गवांदे : सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. २२ : धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्या-पाड्यांसह संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी आतापासूनच पाणी आराखडा तयार करण्याची गरज आहे. विहिरी अधिग्रहित करून टँकर भरण्याचे स्रोत निश्चित करणे, टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन आणि शेतीसाठी पाणी आरक्षण करण्याबरोबरच जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी. तसेच स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा पावसाने अर्ध्यावरच दडी मारल्याने भात पिकांबरोबरच आता दुग्ध व्यवसाय, चाराटंचाई निर्माण होणार असल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात शहरासह तालुक्यातील १२९ महसुली गावांपैकी पूर्वभागातील अनेक गावांना पाण्याची टंचाई कायम भेडसावत आहे. आजही काही आदिवासी वाड्या-पाड्यांत दूषित आणि गढूळ पाणी पिण्याची वेळ आदिवासी बांधवांवर येते. मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे इगतपुरी, घोटीचा तांदूळ महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. मात्र शेतकऱ्यांच्या अनेक जमिनी धरणे, महामार्ग शासनाकडे गेल्यामुळे आहे त्या शेतीत थोड्या-फार पिकांसह आदिवासी बांधवांनी गाई, म्हशी, शेळीपालन हाती घेऊन जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायात भाग घेतला आहे. मात्र यंदा पावसाने दडी मारल्यामुळे जनावरांसाठी चारा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने चार छावण्या सुरू कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्के पाऊस कमी ७ ऑक्टो. पर्यंत पाऊस - ३४७१ मिमी गेल्या वर्षीचा पाऊस- ४२८० मिमी इन्फो... या आहेत इगतपुरीकरांच्या अपेक्षा.. - तालुक्यातील खरिपाची नजर पैसेवारी तातडीने करण्यात यावी. - अनेक गावांना वाड्यांमधील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावनिहाय कृती आराखडा तयार करावा. - अतिदुर्गम भागातील आदिवासी वाड्या-पाड्यांना टँकरद्वारे पाण्याचे नियोजन करून दररोज शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी. - धरणाचे पाणी आरक्षण करून सर्व स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा योजना करण्यात यावी. - सर्वच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. - दारणा धरणातून पूर्वभागातील बेलगाव कुऱ्हे, सर्वतीर्थ टाकेद परिसरातील धानोशी, ठोकळवाडी, वासाळी, खडकेड, रामनगर, कचरवाडी, अधरवड, तारीचा मोडा, आघाणवस्ती, ठाकूरवाडी आदी गावात आतापासूनच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. - तालुक्यातील धरणक्षेत्रात पाणी आहे पण सततच्या होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे शेतीला पुरवठा होत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत करावा. - आदिवासी भागात पशुधनासाठी फिरत्या पशू वैद्यकीय अधिकारी नेमून सर्वच जनावरांची लसीकरण मोहीम राबवावी. - अनेक भागात जाण्या- येण्यासाठी रस्ता नसल्याने गाव तिथे रस्ता या अंतर्गत वाड्या-पाड्यांना रस्ता करून देण्यात यावा. - पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गावातील विहीर अधिग्रहीत करावी व टँकर भरण्याचे स्त्रोत करून प्रत्येक गावात टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन करावे. - जलसंधारणाची कामे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, पाझर तलावांची दुरुस्ती करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. - रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबीयांना प्रत्येक गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. - आदिवासी भागातील अंगणवाड्यांमध्ये तसेच शाळांमध्ये पोषण आहार व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत करावा. - तालुक्यात विविध स्थळांना पर्यटनाचा दर्जा मंजूर करून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. - भावली धरण परिसरात पर्यटनाला चालना देऊन हॉटेल, रिसॉर्ट, बंग्लोज येथे स्थानिक पातळीवर महिलांना रानभाज्या, तांदूळ विक्रीची व्यवस्था करावी. तालुक्यातील पशुधन गायी - ३४०१५ म्हशी - १९७०३ शेळ्या - १३५१ मेंढ्या - १६००९ एकूण - ५६३७२४ ---------- धरण साठा (टक्क्यांत) दारणा - ९९.४० मुकणे - ८२.८७ वाकी - ९६.९९ भाम - १०० भावली - १०० कोट... पावसाअभावी जमिनीला भेगा पडल्या आणि भात, उडीद, भुईमूग ही पिके हातातून गेली. वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांच्या गरजा कशा भागवायच्या, हीच आता मोठी चिंता आहे. पंचनामा झाला असून शासनाची मदत लवकर मिळाली तरच आमच्यासारख्या शेतकरी कुटुंबांना आधार मिळेल. - गुजराबाई बांगर, शेतकरी, गरुडेश्वर (फोटो - IG226B05865) कोट... शासनाने दुष्काळ जाहीर केला पण अजून कुठेही कार्यवाही केली नाही. पंचनामे सरसकट करावेत, पिण्याच्या पाण्याचे व विजेचे नियोजन करावे, रोजगार हमीची विविध कामे सुरु करून निधी उपलब्ध करून द्यावा, दुष्काळ जाहीर केला पण तत्काळ मदत ही शेतकऱ्यांना पोहच व्हावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी. - पांडुरंग वारुंगसे, शेतकरी, बेलगाव तऱ्हाळे (फोटो - IG226B05864)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com