Nashik News: खरिपातला दुष्काळ! येवल्यात रिमझिमीवर 98 टक्के पेरणी, पिकांची वाढ खुंटली

Stunted growth of maize and leaf spot infestation
Stunted growth of maize and leaf spot infestationesakal

Nashik News : शेतकऱ्यांनी रिमझिमवर पेरणीचा जुगार खेळला असून, तब्बल ९८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीन, मूग यांसह मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तर कपाशीची अवघी दहा टक्के पेरणी झाली आहे.

ढगाळ हवामान व सरीवर पिके तक धरून असली तरी वाढ खुंटली असून, रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. (Drought in Kharipat 98 per cent sowing in Yavla rains growth of crops was stunted Nashik News)

आतापर्यंत एकही मुसळधार पाऊस पडला नसून, सरासरी १४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हलक्याशा पावसावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे.

आतापर्यंत ७० हजार ५९७ हेक्टरपैकी ६९ हजार ३०६ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, सध्या तरी दुबार पेरणीची परिस्थिती नाही. मात्र, पावसाने उघडीप दिली तर पिके धोक्यात येतील, अशी परिस्थिती नाही.

सध्याही अनेक ठिकाणी सरीच असल्याने मका, कपाशीसह सोयाबीन व इतर पिकांची वाढ खुंटली आहे.

पुढील दोन आठवड्यात अपेक्षित पाऊस न झाल्यास मोठा फटका पिकांना बसू शकेल. शिवाय सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असून, मक्यावर अळी पडत आहे.

पावसाअभावी पिकांना खते देणेही शक्य नसल्याने दुकानांमध्ये मागणी अत्यल्प आहे. पावसाअभावी टोमॅटोची लागवड घटली असून, इतर भाजीपाल्याचे क्षेत्रही घटल्याने सध्या बाजारात ८० ते १२० रुपये किलोने सर्व भाजीपाला मिळत आहे.

याशिवाय आठ हजार ६७९ हेक्टरवर मुगाची, तर चार हजार ८९७ हेक्टरवर बाजरीची पेरणी केली आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी कांदा रोपे टाकणे सुरू केले आहे. अत्यल्प पावसावर येऊ शकतील असे सोयाबीनकडे मोठा कल आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Stunted growth of maize and leaf spot infestation
Nashik News: निफाड तालुक्यातील रस्त्याची कामे लागणार मार्गी! विकासासाठी 64 कोटींचा निधी मंजूर

सोयाबीनची १५ हजार ६४७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली असून, ३७ हजार ५४६ हेक्टर मका लागवड झाली आहे. पाऊस लांबल्याचा परिणाम कपाशीवर झाला असून, केवळ ११६३ हेक्टरवरच कपाशी लागवड झाली आहे.

तालुक्यात नदी, नाले व जलस्रोतांना पाणी उतरण्यासारखा एकही पाऊस न झाल्याने ४५ गावे व वाड्यांना १६ टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.

"हलक्या पावसावर झालेली पेरणी चांगल्या स्थितीत आहे. मात्र मुसळधार पावसाची अत्यावश्यकता आहे. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे नियोजन केल्याने कपाशीचे क्षेत्र घटले आहे. सोयाबीन व मक्याची लागवड वाढली आहे. पिकांची वाढ व रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे."- साईनाथ कालेकर, कृषी सहाय्यक, येवला

अशी झाली पेरणी (हेक्टरमध्ये)

मका - ३७५४६ हे. - १०६ टक्के

मूग - ८६७९ हे. - १६६ टक्के

सोयाबीन - १५६६७ हे. - ३३२ टक्के

बाजरी - ४८९७ हे. - ५४ टक्के

तूर - १४९ हे. - १३ टक्के

भुईमूग - १२२२ हे. - ४७ टक्के

कपाशी - ११६३ हे. - ११ टक्के

एकूण - ६९३०६ - ९८.१७ टक्के

Stunted growth of maize and leaf spot infestation
Nashik: शाळा अनुदान टप्प्यांसह शालार्थचे निकष शिथिल करणार! केसरकर यांचे आमदार दराडे यांच्या बैठकीत आश्वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com