चारा टंचारा टंचाईचे संकटचाईचे संकट

चारा टंचारा टंचाईचे संकटचाईचे संकट
Published on: 
पशुधन आणि चारा याचा फोटो वापरावा. --- सहा महिने पुरेल एवढाच चारासाठा दुष्काळात पाणीटंचाईचे संकट, पशुधन जगविण्याचे आव्हान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ११ : जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्यात महिन्याला १.४ लाख टन चाऱ्याची गरज असते. उपलब्ध साठा सरासरी १८१ दिवस पुरेल एवढा आहे, असा प्रशासनाचा अंदाज आहे. पावसाच्या खंडामुळे पुढील चारा नियोजनाचे आव्हान आहे. पावसाच्या खंडाचा परिणाम आता शेतीबरोबरच पशुधनावरही होण्याची भीती निर्माण झाली आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. शेतातील वैरणीची कमतरता आणि जनावरांच्या संगोपनाचा वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर चारा उपलब्धता आणि भविष्यातील गरज यांची सांगड घालताना जिल्हा प्रशाासनाची कसरत होणार आहे. खरीप उत्पादन घटल्याने चाऱ्याची चिंता यंदा जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र ७ लाख २१ हजार ५१८ हेक्टर नोंदविण्यात आले. यात कापूस चार लाख ३० हजार ४२६ हेक्टर, मका १ लाख ७१ हजार ५७१ हेक्टर आणि सोयाबीन ४३ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रावर होते. पावसाच्या खंडामुळे विविध पिकांच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे. मका उत्पादनात ४० ते ४५ टक्के, तर बाजरी उत्पादनात ५० ते ६० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा परिणाम पिकांच्या अवशेषांपासून मिळणाऱ्या पशुखाद्यावरही होऊ शकतो. जिल्ह्यात चाऱ्याचा सध्याचा साठा सहा महिन्यांपर्यंत पुरेल, असा प्रशासनाचा अंदाज असला, तरी पुढील काळात रब्बी पेरणी कमी झाल्यास चारा उत्पादनावर अतिरिक्त परिणाम होऊ शकतो. ------------ आकडे बोलतात... दुष्काळ जाहीर झालेले तालुके-- १५ पैकी १५ महिन्याची चाऱ्याची गरज-- १.४ लाख टन उपलब्ध साठा पुरण्याचा अंदाज-- १८१ दिवस जिल्ह्याची अपेक्षित वार्षिक पर्जन्यमान सरासरी-- ६०३ मिलिमीटर प्रत्यक्ष नोंदवलेला पाऊस-- ४८६ मिलिमीटर पावसाची तूट सुमारे-- २३ टक्के --- कोट जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेऊन विकण्यास बंदी घातली आहे. यामुळे जिल्ह्यातील चारा जिल्ह्यातच राहील. वन विभागाने चारानिर्मितीचा लक्षांक घेतला आहे. यामुळे तो चारा वाढणार आहे. चारा उत्पादन वाढविण्यासाठी पशूसंवर्धन विभाग, कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत. - रोहन घुगे, जिल्हाधिकारी ---- जिल्ह्यातील पशुंंचे चित्र असे पशुंची संख्‍या जनावरांची संख्‍या......४ लाख ९६ हजार ७२३ म्‍हशी..............२ लाख ४८ हजार ३३० एकूण मोठे जनावरे....७ लाख ४५ हजार ५३ मेंढ्या..........४८ हजार १० बकर्या..........४० हजार ६५६ लहान जनावरे....४ लाख ४८ हजार ६६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com