धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 34798
धुळे : वंचित बहुजन आघाडीतर्फे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करताना आंदोलक.
--
वंचित आघाडीतर्फे ‘काळी दिवाळी’
-
जिल्हाधिकारी कार्यालयात चटणी- भाकर खाऊन निषेध
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : राज्यातील भीषण दुष्काळी स्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलनातून ‘काळी दिवाळी’ पाळण्यात आली. शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांसोबत चटणी- भाकर खाऊन राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
-
दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे आणि महासचिव सोमनाथ साळुंखे यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन छेडण्यात आले. अनियमित पाऊस आणि प्रशासकीय नियोजनाअभावी हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहेत. तसेच, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, कामगार व ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असताना सरकारकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, प्रभारी जिल्हाध्यक्ष चंद्रमणी वाघ, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, आबासाहेब खैरनार, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, उपजिल्हाध्यक्ष सीताराम वाघ, बी. टी. अहिरे, किरण मोरे, मुकुंद माणिक, आकाश बागूल, महासचिव दिलीप बोरसे, साक्री तालुकाध्यक्ष नितीन मोहिते, शिंदखेडा तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, धुळे तालुकाध्यक्ष अमोल पवार, शिरपूर तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ सहभागी झाले.