जिल्ह्यातील ७७७ गावांना दुष्काळाच्या झळा

जिल्ह्यातील ७७७ गावांना दुष्काळाच्या झळा
Published on: 
जिल्ह्यात ७७७ गावांना दुष्काळाच्या झळा --- टंचाई निवारणासाठी १३.८४ कोटींचा आराखडा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २० : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १३ कोटी ८४ लाख ४२ हजारांचा कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यात जिल्ह्यातील ७७७ गावे आणि एक हजार २८७ वाड्यांमधील संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा, खासगी विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरींची निर्मिती आणि पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती अशा नऊ उपाययोजनांचा समावेश आहे. प्रशासनातर्फे हा आराखडा सरकारला सादर करण्यात आला. जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने जिल्ह्यातील १३ तालुके दुष्काळी घोषित केले आहेत. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमार्फत सन २०२६- २७ साठी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. आराखड्यात प्रगतीतील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, नवीन विंधन विहिरी घेणे, नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्तीसह तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना राबविणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विहिरी खोल करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा अशा विविध उपाययोजनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. टँकरसाठी ११.१५ कोटी प्रस्तावित आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ११ कोटी १५ लाख ६० हजारांचा, तर खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी एक कोटी ९२ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती व तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी प्रत्येकी २८ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले. तसेच, विहिरी खोलीकरणासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तीन टप्प्यांत उपाययोजना संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६, जानेवारी ते मार्च, तसेच एप्रिल ते जून २०२७ अशा तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यातील परिस्थितीचा आढावा घेत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना राबविणे शक्य होईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com