पीकविम्याच्या प्रश्नांवर तातडीने

पीकविम्याच्या प्रश्नांवर तातडीने
Published on: 
NSK26H33621 पाळधी (ता. धरणगाव) : शासकीय विश्रामगृहात सोमवारी झालेल्या दुष्काळी आढावा बैठकीत अधिकाऱ्यास जाब विचारताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. शेजारी जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर. --- पाणी, चारा, पीकविम्याबाबत कार्यवाही करा --- पालकमंत्री : एक लाख ‘जलतारा’ निर्मिती होणार, दुष्काळाचा बैठकीत आढावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतकऱ्यांना वीज, चारा व इतर सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच युद्धपातळीवर नियोजन करावे. जलजीवन मिशनसह अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे महिन्याच्या आत पूर्ण करा. जलसंधारण विभागाने अपूर्ण बंधारे, नाला खोलीकरण, पाझर तलावांची कामे पूर्ण करण्यासह नादुरुस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे. जलतारा योजनेंतर्गत जिल्ह्याला ५८ हजार जलतारानिर्मितीचे उद्दिष्ट असले, तरी एक लाख ‘जलतारा’ निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून नियोजन करा. विकासकामांत दिरंगाई व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक विभागाने ‘मिशन मोड’वर काम करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाळधी (ता. धरणगाव) येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता. २६) जळगाव व धरणगाव तालुक्यांतील विविध विभागांच्या झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा, वीज, जलसंधारण, चारा उपलब्धता, पीकविमा, शेती, शेतरस्ते व विकासकामांचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. ‘महावितरण’ने ट्रान्सफॉर्मर, केबल, फ्यूज व वीजपुरवठ्यातील बिघाड तातडीने दूर करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा २४ तास सतर्क ठेवावी. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य देऊन प्रलंबित कामे जलद गतीने पूर्ण करावीत. पाण्यासंदर्भातील प्रलंबित वीजजोडण्यांसाठी महावितरण व पाणीपुरवठा विभागाने एकत्रितपणे कार्यवाही करावी. कानळदा-किनोद व आव्हाणी-भोकणीदरम्यान नवीन वीज उपकेंद्रे उभारण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत. पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर करण्यासाठीही प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पशुसंवर्धन विभागाने संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन चारा लागवड व उपलब्धतेचे नियोजन करावे. पाणी योजना कार्यान्वित करा जिल्हाधिकारी घुगे यांनी ९० टक्के काम पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांमधून एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. लघुसिंचन विभागाने सिंचनाची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. शेतकऱ्यांचे प्रश्न व पीकविम्याची प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावावीत. पाणीपुरवठा उपअभियंता सुनील मोरे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com