दुष्काळी नियोजनातून नव्या बंधाऱ्यासह दुरूस्तीची कामे गायब..! येवल्यात जलतारा,रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या ४ हजार कामांचे नियोजन;जलसंधारणाच्या २२ कामांना शून्य स्थान

दुष्काळी नियोजनातून नव्या बंधाऱ्यासह दुरूस्तीची कामे गायब..! येवल्यात जलतारा,रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या ४ हजार कामांचे नियोजन;जलसंधारणाच्या २२ कामांना शून्य स्थान
Published on: 
दुष्काळी नियोजनातून नव्या बंधाऱ्यांसह दुरूस्तीच्या कामांना बगल रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या हजारो कामांचे नियोजन; जलसंधारणाच्या २२ कामांना शून्य स्थान सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ४ : सर्वाधिक कमी पाऊस आणि दुष्काळाच्या सर्वाधिक तीव्र झळा तालुक्यात असताना जिल्ह्याच्या दुष्काळ अनुषंगिक कामांच्या तालुकानिहाय आराखड्यात माती बंधारे, सिमेंट बंधारे, दगडी बांध आणि सिंचन विहिरींसारख्या पाणी साठवण व जलसंधारणाच्या मूलभूत एकही काम धरलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याउलट तालुक्यासाठी ४ हजार ८५ कामे दिसत असली तरी त्यात जलतारा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे कामे असल्याने बंधाऱ्यांची कामे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात दुष्काळ अनुषंगिक कामांचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यात तालुक्यासाठी जलतारा उभारणीची २ हजार ५००, रेन वॉटर हार्वेस्टिंगची १ हजार, विहीर पुनर्भरणाची ४५०, शोषखड्ड्यांची ९० आणि गाळ काढण्याची ४५ कामे प्रस्तावित आहेत. या पाच प्रकारची ४ हजार ८५ कामांचा समावेश असला तरी प्रत्यक्ष पाणी अडवून जिरविणाऱ्या कामांची संख्या शून्य असल्याने पाणी साठवणुकीचा मुद्दा दुर्लक्षित झाला आहे का? असा सवाल होत आहे. जलताराला पाणी साठविण्याची साधने कुठे? जलतारा उभारणीसाठी २ हजार ५०० कामे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी १ हजार कामे प्रस्तावित आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि भूजल पुनर्भरणासाठी ही कामे उपयुक्त ठरू शकतात. मात्र, त्याचवेळी पावसाचे पाणी अडविण्यासाठी आवश्यक असणारे बंधारे, शेततळी आणि तलाव पुनर्जीवन यांसारख्या कामांचा अभाव जाणवतो. २२ प्रकारची कामे वगळली तालुकानिहाय नियोजना येथे माती बंधारे, सिमेंट बंधारे, दगडी बांध, शेततळी, सिंचन विहिरी, माती नालाबांध, गुरांचे गोठे, फळबाग लागवड, वृक्षलागवड, तुती लागवड, गांडूळ खत, तलाव पुनर्जीवन, भात खाचर, भूमिगत बंधारे, नदी पुनर्जीवन, गॅबियन बंधारे, सीसीटी चर, बंधारा दुरुस्ती, वनतळे, गुरे प्रतिबंधक कामे आणि रस्ते अशा २२ प्रकारच्या कामांसाठी शून्य नोंद आहे. त्यामुळे गुरांचे गोठे, फळबाग लागवड, गांडूळ खत आणि जलसंधारणाशी संबंधित कामांचा विचार होणे अपेक्षित असताना या कामांचा नियोजनात समावेश नसल्याचे दिसते. येवल्याच्या वाट्याला ६.३ टक्के काम १५ तालुक्यांसाठी ६४ हजार ५२७ दुष्काळ अनुषंगिक कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात मालेगाव तालुक्यात सर्वाधिक २२ हजार कामे आहेत. एकूण नियोजनात येवल्याचा वाटा सुमारे ६.३ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.